राज्यातील बहिणीच नव्हे मुलीही असुरक्षित -उद्धव ठाकरे

Badlapur Minors Sexual Abuse Case: दिल्लीतील निर्भया कांडात आरोपींना देखील किती वर्षांनी फाशीवर लटकवण्यात आले, याचे उदाहरण आपल्यासमोर असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
राज्यातील बहिणीच नव्हे मुलीही असुरक्षित -उद्धव ठाकरे
संग्रहित फोटो
Published on

मुंबई : एका बाजूला लाडकी भाई योजना आणत असताना राज्यातल्या बहीणीच नव्हे तर छोट्या-छोट्या मुलीदेखील असुरक्षित आहेत. आपल्या राज्यातच नाही तर देशात कुठेही अशी घटना घडता कामा नये. अशा घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हायला हवी. मग ती फास्ट ट्रॅक असो किंवा इतर कोणत्याही प्रकारे असो. दिल्लीतील निर्भया कांडात आरोपींनादेखील किती वर्षांनी फाशीवर लटकवण्यात आले, याचे उदाहरण आपल्यासमोर असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

या सर्व दिरंगाईला जबाबदार कोण? एखाद्या महिलेवर अत्याचार करणारे गुन्हेगार जसे जबाबदार असतात. तसेच त्याचा न्यायनिवडा करण्यात दिरंगाई करणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे. अशा घटनेचे राजकारण न करता अशा प्रकरणातील आरोपींना सोडता कामा नये. सर्वजण जात, भेद, पक्षभेद विसरून एकत्र आले तरच राज्यातील महिला सुरक्षित राहतील. माझ्या राज्यातील महिला या सुरक्षित असतील तरच ती माझी लाडकी बहीण आहे, असे आपण म्हणू शकतो, असेदेखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शक्ती विधेयक आणण्याची गद्दारांची जबाबदारी

अशा घटनांच्या विरोधात शक्ती विधेयक आणायची आमची इच्छा होती. महाविकास आघाडीच्या सरकार काळात त्याचा मसुदा देखील तयार झाला होता. मात्र, त्या काळामध्ये एक दोन दिवसच अधिवेशने होत होती. त्याला कारण कोरोना होते. मात्र गद्दारांनी गद्दारी करून आमचे सरकार पाडले. त्यांनी हे विधेयक लटकवून ठेवले आहे. त्यामुळे शक्ती बिलाची शक्ती या आरोपींना दाखवून देण्याची जबाबदारी आता गद्दारांवर असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

‘ती’ शाळा भाजपच्या कार्यकर्त्याची

ती शाळा आणि आरोपी देखील भाजपशी संबंधित असल्याचे माझ्या कानावर आले आहे. मात्र मी त्यात राजकारण करणार नाही. तो भाजपचा जरी असला किंवा इतर कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर विनाविलंब कारवाई झाली पाहिजे, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जर भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडून निबंध लिहून त्यांना सोडून देणार आहत का? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in