एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी, तब्बल 18 दिवसांनंतर गुन्हा दाखल

तब्बल 18 दिवसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने हा गुन्हा राजकीय हेतूने दाखल करण्यात आला असल्याची चर्चा उल्हासनगर शहरांत सुरु आहे
एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी, तब्बल 18 दिवसांनंतर गुन्हा दाखल

शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केल्याप्रकरणी उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी व इतर शिवसेना नेत्यांविरुद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 18 दिवसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने हा गुन्हा राजकीय हेतूने दाखल करण्यात आला असल्याची चर्चा उल्हासनगर शहरांत सुरु आहे.

गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतच्या काही आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर उल्हासनगर-२, येथील टिळक नगर शिवसेना शाखाप्रमुख सुरेश पाटील, नितीन बोध, उमेश पवार, संतोष कणसे, लतीश पाटील, युवासेना शाखा अधिकारी बाळा भगुरे यांनी 25 जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उल्हासनगर -२ येथील गोल मैदान परिसरात असलेल्या खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड केली होती. याप्रकरणी वरील आरोपींच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती, यावेळी अटक आरोपींची विचारपूस करण्यासाठी उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, शिवसेना पदाधिकारी संदीप गायकवाड, शिवाजी जावळे, भगवान मोहिते, आदेश पाटील, ज्ञानेश्वर मरसाळे, महेंद्र पाटील व इतर ९ ते १० शिवसैनिक उल्हासनगर पोलीस ठाण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in