२५ घरांवर रेल्वेचा बुलडोजर आज फिरणार
डेडिकेटेड फ्रेड कॉरीडोर प्रकल्पात बाधित घरे रिकामी करून भूसंपादन करण्यास सुरुवात झाली आहे. या पात्र लाभार्थ्यांना रेल्वे प्रशासनाकडून ठरविक रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले होते. डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वेच्या जमिनीवर अण्णानगर झोपडपट्टी आहे. येथील रहिवाश्ाांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली होती. यातील २३० घरांना प्रशासनाने प्रत्येकी १४ लाख रुपये अदा केले. परंतु उर्वरित २५ घरे अपात्र ठरविण्यात आली. ही घरे २६ मे राेजी रिकामी करण्याची नोटीस बजावली असून शुक्रवार २७ मे राजी या घरांवर बुलडोझर फिरवला जाणार आहे.
दरम्यान ही कारवाई झाल्यास आंदोलन करू, असा पवित्रा येथील अपात्र रहिवाश्ाांनी घेतला आहे. महाराष्ट्र रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माणिक उघडे हे या २५ कुटुंबीयांसाठी पुढे आले आहेत.
याबाबत उघडे म्हणाले, सरकारने गोरगरिबांना रस्त्यावर आणून विकास करू नये. येथील अपात्र रहिवाश्ाांचा सरकारने विचार करून पात्र लाभार्थ्यांप्रमाणे न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. याबाबत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही २५ अपात्र कुटुंबीयांना बेघर होऊ देणार नाही. त्याचेही पुर्नवसन करू असे आश्वासन दिल्याचे उघडे यांनी सांगितले. दरम्यान सरकारने आमच्यासाठीही घरकुल योजनेप्रमाणे एखादी याेजना करण्याची मागणी रहिवाशंनी केली आहे.