मुंबई : बदलापूरमधील प्रकार हा धक्कादायक आणि संताप आणणारा असल्याचे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. गुन्हा दाखल करून घेण्याबाबतच पोलिसांनी १२ तास का लावले? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? असल्याचे म्हणत त्यांनी राज्याच्या गृह विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. मात्र महाराष्ट्र सैनिकांना माझे सांगणे आहे की, या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत तुमचे लक्ष असू द्या. एका बाजूला कायद्याचे राज्य म्हणायचे, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून हलगर्जीपणा कसा होतो?”