ठाणे शहारत रिक्षाचालकांची रॅली,मी रिक्षावाला,मी मुख्यमंत्रीचे सर्वत्र बॅनर

एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे विनायक सुर्वे तसेच माजी नगरसेवकानी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला.
ठाणे शहारत रिक्षाचालकांची रॅली,मी रिक्षावाला,मी मुख्यमंत्रीचे सर्वत्र बॅनर

ठाणे जिल्ह्याचे नेते एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर 'मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री' अश्या आशयाचे बॅनर ठाण्यात झळकले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रिक्षावाले असे हिणवल्यानंतर ठाण्यातील रिक्षाचालकांनी एकत्र येत पालिका मुख्यालयासमोर बॅनरबाजी केली. होय आम्हाला अभिमान आहे राज्याचा मुख्यमंत्री एक रिक्षावाला झाला आहे,असे म्हणत संपूर्ण ठाणे शहारत रिक्षाचालकांनी रॅली काढली. यावेळी शहरातही शेकडो हुन अधिक रिक्षाचालक सहभागी झाले होते. माजी महापौर नरेश म्हस्के आणि एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे विनायक सुर्वे तसेच माजी नगरसेवकानी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात गुरुवारी पदभार स्विकारल्यानंतर ठाण्यातील रिक्षा चालकांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पालिका मुख्यालय येथे एक फलक उभारण्यात आला होता या फलकाने सर्वांचे वेधून घेतले आहे. होय. आम्हाला अभिमान आहे..आमचा रिक्षा चालक मुख्यमंत्री झाला, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ संपूर्ण ठाण्यात रिक्षाची रॅली देखील काढण्यात आली. ठाण्यामध्ये िरक्षा चालकांचा एक मोठा वर्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माणनारा असून त्यांची संघटना देखिल आहे. िशंदे हे आनंद िदघे साहेबांच्या छत्रछायेखाली मोठे झाले असून त्यांचा प्रभाव ठाणे शहरात उत्तम अाहे. तसेच िशंदे यांनी ठाणेकरांमध्ये एक आपुलकीपणा िनर्माण केला अाहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ सगळे ठाणेकर उभे झाले आहेत.

या रैलीला खासदार श्रीकांत शिंदे ,माजी महापौर नरेश म्हस्के देखील उपस्थित होते.

यावेळी रिक्षा चालकांनी टीशर्ट घातले होते, त्यावर 'मी रिक्षावाला,मी मुख्यमंत्री' असा उल्लेख असल्याने अनेकांचे डोळे लागले होते. या टीशर्ट वर रिक्षाचे चिन्ह व रिक्षावर लालबत्ती देखील दाखवण्यात आली होती. एकमेकांना पेढे भरवत रिक्षा चालकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in