शिवसेना ठाण्यात पुन्हा एकदा दिघे कार्ड खेळणार

१९६७ च्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्ता मिळाली.
शिवसेना ठाण्यात पुन्हा एकदा दिघे कार्ड खेळणार

यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी चित्रपट काढला आणि बंडखोरी करताना ज्या आनंद दिघे यांचे आपण शिष्य आहोत, हे ठसवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्याच दिघे यांच्या पुतण्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देऊन शिवसेना ठाण्यात पुन्हा एकदा दिघे कार्ड खेळणार असल्याचे दिसत आहे.

१९६७ च्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्ता मिळाली. शिवसैनिक वसंतराव मराठे हे पहिले ठाण्याचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. शिवसेनेच्या विस्ताराला १९७५ नंतर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सुरवात झाली. तेव्हापासून टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम चळवळीचे प्रमुख केंद्र बनले. याच ठिकाणी दिघे यांचा दरबार भरायचा या आश्रमात आलेला व्यक्ती कधीच रिकाम्या हाताने परतायचा नाही, अशी या आश्रमाची ख्याती होती. ठाणे जिल्हा हा पूर्वीचा जनसंघ आणि नंतरचा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा; परंतु शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यात भगवे वादळ निर्माण केले आणि भाजपकडून लोकसभेची ठाण्याची जागा शिवसेनेकडे खेचून घेतली. तेव्हापासून एखाद दुसरा अपवाद वगळता ठाण्याची खासदारकी कायम शिवसेनेकडे राहिली आहे. शहरी असलेली शिवसेना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि गावागावात पोहोचवण्यात दिघे यांचा मोलाचा वाटा असून त्यांच्याकाळात फक्त महापालिकाच नव्हे, तर गावागावातील सरपंचपदावरही शिवसैनिकांना निवडून आणण्याचे आणि जिल्ह्यात संघठन वाढवण्याचे काम दिघे यांनी केले.

ठाण्याच्या राजकारणात जेव्हा दिघे सक्रिय होते, तेव्हाच्या निवडणुकांच नव्हे तर त्यांच्या नंतरच्या प्रत्येक लहानमोठ्या निवडणुकीत शिवसेनेकडून आनंद दिघे कार्ड वापरले गेले. जेव्हा आनंद परांजपे पोटनिवडणुकीसाठी उभे होते, तेव्हा तुम्ही आनंदला मत देणार ना ? अशी स्लोगन शिवसेनेकडून वापरली गेली. तर प्रत्येक निवडणुकीचा प्रचार करताना दिघे यांची समाधी असलेल्या शक्तीस्थळाला स्मरून सुरवात केली गेली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे दर्शन घेतले तर ठाण्यात येताच दिघे यांच्या शक्तिस्थळावर जाऊन पुष्पचक्र वाहिले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कार्यालयात जशी बाळासाहेब ठाकरे यांची तसबीर लावली आहे, त्याच प्रकारे आनंद दिघे यांचीही प्रतिमा लावली आहे.

विशेष म्हणजे त्याच दिघे यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देऊन शिंदे यांच्यासमोर मूळ शिवसेनेने आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in