इलेक्ट्रॅानिक चीप लावून स्टील चोरी करणारे अटकेत

इलेक्ट्रॅानिक चीप लावून स्टील चोरी करणारे अटकेत

चोरी करताना तांत्रिक बाबींचा वापर करून न कळणारी चोरी उघडकीस आणण्यास मानपाडा पोलिसांना यश आले आहे. वजनकाट्याच्या खालच्या बाजूला इलेक्ट्रॅानिक चीप लावून स्टील चोरून ते भंगारवाल्यांना विकून कोट्यवधी रुपये कमविणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. यातील चीप बनविणारा इंजिनिअर फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

नितीन दला चौरे, दिदिरसिंग मंगलसिंग राजू, दिलबागसिंग हरबन्ससिंग गिल, फिरोज मेहबुब शेख, शिवकुमार चौधरी, हरविंदरसिंग मोहनसिंग तुन्ना आणि बलवीरसिंग राजपूत अशी या सात जणांची नावे आहेत. या गुन्ह्यात एकूण दोन कोटी आठ लाख किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यात मालवाहू ट्रक, स्टील, इलेक्ट्रॉनिक चीप, रिमोट, मोबाईल फोन असा मुद्देमाल समाविष्ट आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in