Thane : पुन्हा भिडले ठाकरे गट आणि शिंदे गट; खासदारांसमोरच सुरु झाला वाद

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उडतायत खटके
Thane : पुन्हा भिडले ठाकरे गट आणि शिंदे गट; खासदारांसमोरच सुरु झाला वाद

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केला आणि राज्यात एक ऐतिहासिक सत्तांतर पाहायला मिळाले. मात्र, यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा खटके उडाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्त्ये आमने सामने आले आणि जोरदार वाद सुरु झाला. ठाण्याच्या किसननगर परिसरात ही घटना घडली.

ठाकरे गटाकडून ठाण्यात किसननगर परिसरात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या किसननगर परिसरात ठाकरे शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ठाण्याचे खासदार राजन विचारे देखील उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी सुरुवातीला घोषणाबाजी केली आणि नंतर या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं आहे. शिंदे गटाचे योगेश जानकर यांच्याकडून उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांना मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in