ठाण्यात शिंदेंना घेरण्याची रणनीती! उद्धव-राज ठाकरे गट सक्रिय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जुन्या ठाण्यात मागील काही दिवसांत उद्धव ठाकरे गट आणि मनसेने सक्रिय हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात शरद पवार गटाचाही पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
ठाण्यात शिंदेंना घेरण्याची रणनीती! उद्धव-राज ठाकरे गट सक्रिय
Published on

ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. ठाणे महापालिका जिंकण्यासाठी आता नवीन राजकीय समीकरणे जुळू लागली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जुन्या ठाण्यात मागील काही दिवसांत उद्धव ठाकरे गट आणि मनसेने सक्रिय हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात शरद पवार गटाचाही पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

भाजपने शिंदेंचा प्रभाव कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांत संघटनात्मक पातळीवर जोर लावला आहे. आता उद्धव सेना आणि मनसे यांनी मिळून वाहतूककोंडी, महापालिकेतील भ्रष्टाचार, पाण्याचा तुटवडा, रस्त्यांवरील खड्डे अशा जनतेच्या थेट प्रश्नांवरून शिंदे गटाला घेरण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी ठाणे हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात होता. पण अलीकडच्या काळात भाजपने आपले बळ प्रस्थापित केल्याचे पहावयास मिळत आहे. दोन्ही ठाकरे गटांच्या मतांच्या बेरीजेपेक्षा अधिक मते भाजपकडे गेल्याचे दिसते. काही प्रभागांमध्ये उद्धव सेना आणि मनसे यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या भागांवर दोन्ही पक्षांनी लक्ष केंद्रीत केले असून, एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.

ठाण्यातील पक्षीय बलाबल

ठाण्यात सुमारे २० नगरसेवकांपैकी भाजपचे १२, शिंदे सेनेचे ४, आणि अजित पवार गटाचे ४ नगरसेवक आहेत. मात्र मतदारांच्या अलीकडील कलानुसार उद्धव सेना आणि मनसेची मतं मिळून मोठा फरक निर्माण करू शकतात. ठाणेकरांना सध्या पाण्याची कमतरता, वाहतूककोंडी, पार्किंग, रस्त्यांची दुरवस्था आणि महापालिकेतील भ्रष्टाचार यांसारख्या समस्या भेडसावत आहेत. उद्धव सेना आणि मनसे या मुद्द्यांवरून ‘जनतेच्या मनात प्रवेश’ करण्याचा प्रयत्न करत असून, भाजप-शिंदे गटाला थेट आव्हान देण्याची रणनीती आखत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in