यंदा पहिल्या पावसात ठाणेकरांना शहर पाण्याखाली जाण्याचा अनुभव नाही

पाण्याचा निचरा चांगला झाला त्यामुळे यंदाची नालेसफाई चांगली झाली आसल्याचे तूर्त तरी उघड झाले आहे.
यंदा पहिल्या पावसात ठाणेकरांना शहर पाण्याखाली जाण्याचा अनुभव नाही

मोठ्या प्रमाणात नाल्यांचे काँक्रीटीकरण झालेले असतांना नाले सफाईचा खर्च कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. दरवर्षी पावसाळापूर्व कामासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात येत असले तरी नाल्यांची सफाई कधीच पूर्ण होत नाही. वरवरची सफाई केली जाते आणि नालेसफाई झाली असल्याचे दाखवून बीलं पास केली जातात. अशा प्रकारचे आरोप दरवर्षी प्रशासनावर होत असतात. गेल्या काही वर्षाचा अनुभव पहाता पहिल्याच पावसात शहरातील बहुतांशी रस्ते पाण्याखाली जातात. परंतु यंदाचा अनुभव मात्र वेगळा असून दोन दिवसात २६२ मि मी पाऊस पडूनही पाणी जमा होण्याच्या जागा यंदा कमी झाल्याचे दिसून आले. बाजारपेठ , तलावपाळी , वंदना सिनेमा या ठिकाणी पाणी जमा झाले मात्र इतरत्र पाण्याचा निचरा चांगला झाला त्यामुळे यंदाची नालेसफाई चांगली झाली आसल्याचे तूर्त तरी उघड झाले आहे.

ठाणे महापालिकेत गेल्या काही वर्षात नालेसफाईच्या नावाखाली कोट्यावधी रूपयांची लूट सुरू असल्याचे आरोप झाले आहेत. नालेसफाई योग्य झाली असल्याचे दावे पालिकेच्या वतीने करण्यात येतात, परंतू पहिल्याच शहरात ठिकठिकाणी पाणी जमा होतं. गेल्या काही वर्षाचा अनुभव पहाता अशा प्रकारे शहरात पाणी तुंबण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. २०१९ साली शहरात ३५४ ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले होते तर गेल्या वर्षी १७३ ठिकाणी पाणी जमा झाले होते. त्यामुळे यंदाही मोठा पाऊस पडल्यास शहरात मोठया प्रमाणात पाणी जमा होऊ शकते असे सांगण्यात येत होते.

यंदा प्रत्येक प्रभाग समिती निहाय टेंडर काढून जादा ठेकेदार नेमण्यात आले आहेत. त्यामुळे युद्धपातळीवर नालेसफाई चे काम करण्यात येत असून गेल्या काही वर्षाचा अनुभव पहाता पहिल्याच पावसात शहरात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते, बहुतांशी रस्ते आणि झोपड्या पाण्याखाली जातात अशी परिस्थिती निर्माण होत असते. विशेष म्हणजे ज्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते त्या वर्षी शहरात पाणी तुंबण्याच्या घटना वाढतात असे उघडकीस आले आहे. परंतु यंदा पहिल्या पावसात ठाणेकरांना शहर पाण्याखाली जाण्याचा अनुभव काही आला नाही. दोन दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला मात्र हा पाऊस अधून मधून येत असल्याने पाण्याचा निचरा होत होता त्यामुळे पाणी जमा होण्याच्या घटना कमी झाल्या असेही सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in