शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा सुरु

शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा सुरु

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसंपर्क अभियानाला संपूर्ण महाराष्ट्रभर सुरूवात करण्यात आलेली आहे. त्यापैकी पहिला टप्पा गोंदिया येथे संपन्न होऊन शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा अभियान प्रमुख खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण व कर्जत विधानसभा मतदार संघापासून सुरू झाला आहे.

उलवे येथून बाईक रॅली गव्हाण, कोपर, जासई, चिरनेर, येथे रवाना झाली. तेथे महागणपतीचे दर्शन घेऊन उरण येथील यूएस शाळेच्या सभागृहात जाहीर सभा घेण्यात आली.

यावेळी उरण विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटनात्मक बांधणी आणि शिवसेना पक्षाचे बळकटीकरण करण्यासंदर्भात खासदार राजन विचारे यांनी चर्चा करीत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना उरण विधासभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. राज्यभरात किंबहुना संपूर्ण देशात कोणतेही संकट आले असता शिवसेनेचा शिवसैनिक नेहमी मदत करण्यासाठी अग्रस्थानी असतो ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आहे, गेल्या दोन वर्षांत खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, महिला जिल्हा संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर, आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपसि्थत हाेते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in