शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शाळा तोडली, नव्या शाळेला जागा मिळेना

कौलारू शाळा तोडून त्याठिकाणी नव्या इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे.
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शाळा तोडली, नव्या शाळेला जागा मिळेना

तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्वच शाळा डिजीटल होत असल्याने खाटेघर येथील सुस्थितीत असणारी शाळा नव्याने बांधण्यासाठी तोडण्यात आली. मात्र नव्याने बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यार्थी सभागृहात धडे गिरवत असल्याने शिक्षण विभागाचे कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे गुणवत्तेस चालना मिळावी यासाठी शिक्षण विभागाने सर्व शिक्षण विभागाचे माध्यमातून !! सारे शिकुया पुढे जाऊया !! या कार्यप्रणालीचा अवलंब करत सर्वच शाळा डिजीटल करण्याचा प्रयत्न होत असल्याने ज्या शाळांनी या अगोदर शिक्षक, अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील,तसेच उत्कृष्ट खेळाडू घडविले. कौलारू शाळा तोडून त्याठिकाणी नव्या इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे. शाळा डिजीटल करण्यासाठी खाटेघर येथील सुस्थितीत असणारी पुरातन शाळा तोडली मात्र त्या ठिकाणी नव्याने इमारती उभारण्यासाठी जागेची समस्या निर्माण होत असल्यामुळे नव्या इमारतीचे बांधकाम करणार कुठे ? तसेच आम्ही आमच्या मुलांना शिक्षण द्यायचे कुठे? असे अनेक प्रश्न स्थानिक नागरिकांना आणि शिक्षकांना पडला असला तरी याचे उत्तर सध्या कोणाकडेच नाही, ही खेदाची बाब आहे. व्यवस्थित शाळा आणि शिक्षण मिळत नसल्यामुळे गवातील मुलांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. मात्र येथील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सदरची शाळा गावातील सभागृहात भरण्याचा निर्णय घेतला.

ज्या सभागृहात शाळा भरविली जाते, त्या सभागृहात कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम होत नव्हते. तसेच त्या सभागृहाचा ग्रामस्थांकडून वापर होत नसल्याने त्याची देखील दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी गळती लागली आहे, सभागृहाचा काहिसा भाग मोडकळीस आलेला आहे. पाण्याची तसेच शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे येथे येणार्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in