
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
यानंतर भारतीय जनता पार्टीसोबत चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन शिवसेना या पक्षावरच दावा ठोकल्याने इथल्या शिवसैनिकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. यामध्ये शिवसैनिक "ज्यांच्या निष्ठा बाळासाहेब यांच्याबरोबर होत्या, "त्या शिवसैनिकांमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती" अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. आणि आजमितिला गांधरे येथील कुणबी समाज गृहामध्ये इथल्या दिग्गज असलेले पदाधिकारी माजी पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे, महीला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, जिल्हा परिषद सदस्य, मजूर फेडरेशनचे संचालक अरुण ठाकरे, व तालुकाप्रमुख उमेश पठारे, भिवंडी विधानसभा ग्रामीणचे संघटक धनंजय पष्टे, वाडा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष संदीप गणोरे, यांनी सर्व शिवसैनिकांनी जात गोत्र अन् धर्म आमुचा शिवसेना.. असे बॅनर बाजी वाडा शहरात केली आहे. इथले शिवसैनिक शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सोबतआहोत असे दाखवून दिले आहे. यामुळे शिवसेनेची ग्रामीण स्तरावरची पकड अजूनही पक्की आहे.