
वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येणारा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला, यामुळे राज्यातील लाखो तरुणांचा रोजगार गेला, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी उल्हासनगर शहरातील युवासेनेने कॅम्प नंबर ४ परिसरात असलेल्या जिजामाता चौकातील मुख्य रस्त्यावर आंदोलन केले.
या आंदोलनाला जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना प्रमुख बाळा श्रीखंडे, संदीप गायकवाड, बापू सावंत, प्रा. प्रकाश माळी, विजय सावंत, दिलीप गायकवाड, देवेंद्र तरे, गणेश भारंबे, ज्ञानेश्वर मरसाळे, पप्पू यादव, अजय घोडके, दाहिर रामटेक, रूपेश मोहिते, शेखर सपकाळे, करण दराडे, निरंजन पाटील, समीर शेख, युवती सेनेच्या दीपाली कदम यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार होता. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती देखील सुधारणार होती. मात्र सरकारने जाणून बुजून हा प्रकल्प गुजरातला नेला आणि महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना रस्त्यावर आणले याचा निषेध व्यक्त करण्यासाठी युवासेनेच्या वतीने हे निषेध आंदोलन करण्यात आल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.