आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मुलीच्या नावाचा अर्थ सांगितला...

प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच चिमुकलीचं आगमन झाले

त्यांनी त्याच्या मुलीचे नाव राहा (Raha) ठेवले आहे

हे नाव आजी नीतू कपूरच्या पसंतीने ठेवण्यात आले

आलिया भट्टने फोटो शेअर करत नावाचा अर्थही सांगितला

आलिया म्हणाली, 'राहा' नावाचे खूप सारे चांगले अर्थ आहेत

राहा म्हणजे दैवी मार्ग, संस्कृत मध्ये याचा अर्थ कुल, वंश, घराणे असा असतो

तसेच स्वाहिलीमध्ये याचा अर्थ आनंद, बंगालीमध्ये आराम किंवा कम्फर्ट म्हणतात, अरबीमध्ये याचा अर्थ शांतता असा होतो

या सर्वव्यतिरिक्त याचा अर्थ आनंद, स्वातंत्र्य आणि कल्याण असा होतो आणि तिच्या या नावाप्रमाणेच आपल्याला हे सर्व पहिल्या क्षणापासून जाणवत आहे