पालकांमध्ये गोवरविषयी चिंता; तुमच्या पाल्यामध्ये देखील आहेत का 'ही' लक्षणे?

वृत्तसंस्था

मुंबईत गोवरच्या साथीचा धोका वाढला असून, गेल्या २० दिवसांत सात संशयित गोवरग्रस्त बालकांचा मृत्यू झाला

आतापर्यंत १४२ रुग्ण आढळून आले असल्याने चिंतेत भर पडली आहे

गोवर रुबेलाच्या लसीकरणाकडे योग्य वेळी लक्ष न दिलेल्या मुलांमध्ये आजाराची तीव्रता वाढली तर न्यूमोनियाचा त्रास बळावू शकतो.

गोवर हा विषाणूंपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवरचे विषाणू शिंकण्या किंवा खोकण्यातून हवेत पसरतात. गोवरची बाधा कोणत्याही वयोगटात होऊ शकते

या आजारांमध्ये उद्भवणाऱ्या अतिसार, न्युमोनिया आणि मेंदू संसर्ग या सारख्या गुंतागुंतीमुळे मृत्यू होऊ शकतो

तीव्र ताप, शरीरावर लाल पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे. सर्वसाधारणपणे अंगावर गुलाबी-लालसर पुरळ, ताप, खोकला, वाहणारे नाक आणि लालसर डोळे ही गोवरची लक्षणे आहेत

जीवनसत्त्व ‘अ’ कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर असे आजार होण्याचा संभव

गोवर टाळण्यासाठी लसीकरण कार्यक्रमामधून लस दिली जाते. गोवरची पहिली लस नऊ ते १२ महिने आणि दुसरी लस १६ ते १८ महिने या वयोगटांत देण्यात येते.