मुंबईत गोवर आजाराच्या ८४ रुग्णांची नोंद

मुंबईत साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना गोवर आजाराचा संसर्ग वाढला आहे
मुंबईत गोवर आजाराच्या ८४ रुग्णांची नोंद

मुंबईत गोवर आजाराचा संसर्ग वाढला असून सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात ८४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक गोवर आजाराच्या रुग्णांची नोंद गोवंडी परिसरात झाल्याचे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. दरम्यान, गोवंडी परिसरात गुरुवारी दिवसभरात ६९ हजार २१८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून १३० बालकांचे गोवर प्रतिबंधक लसीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना गोवर आजाराचा संसर्ग वाढला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणात संशयित रुग्णांना जीवनसत्व एक विटामीन गोळी देण्यात येत आहे. तसेच, आवश्यकता भासल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. तसेच ९ महिने व १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात येत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बालकांची तपासणी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in