Birthday Special: पाहा कसा झाला अमृता खानविलकरचा प्रवास...

प्रतिनिधी

मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर अमृता खानविलकरचा नृत्यप्रवास 1994 साली सुरु झाला

तिने 2004 मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेस्टार की खोज या मालिकेतील स्पर्धक म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली

तिला नेहमीच चित्रपटांमध्ये अभिनेत्री व्हायचे होते

गोलमाल हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता

नटरंग या मराठी चित्रपटातील तिच्या वाजले की बारा या लावणी नृत्याविष्कारामुळे तिला 2010 मध्ये प्रसिद्धी मिळाली

अमृता खानविलकर हिला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे

गणेशत्सवासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन व्हायचं त्यामध्ये तिने नृत्य करायला सुरुवात केली

“मला कोणी विचारलं मला कोणते नृत्यप्रकार येतात तर मी सांगेन काहीच नाही आणि खूप काही'' असे तिने सांगितले

लहानपणी माझ्या आई-बाबांना कधी वाटलं नव्हतं की पुढे जाऊन मला नृत्यामध्ये एवढी रुची असेल

पण मी एवढ्या कॅसेट रिवाईंड करून खराब केल्या की माझ्या वडिलांना प्रश्न पडायचा की नेमकं मी काय करते?

तसेच आता आलेल्या अमृताच्या चंद्रमुखी सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला

त्यामध्ये तिच्या सगळ्या नृत्यांचं खूप कौतुक झालं

तसेच ती झलक दिखला जा 10 मध्ये ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पहिल्या दुहेरी एलिमिनेशनमध्ये बाहेर पडली आणि ९व्या स्थानावर राहिली