पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'वंदे भारत'ला दाखवला हिरवा झेंडा

प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीएसएमटीवरून सोलापूरला जाणारी नववी 'वंदे भारत ट्रेन'ला हिरवा झेंडा दाखवला

त्यानंतर त्यांनी सीएसएमटीवरून साईनगर शिर्डीला जाणारी दहावी 'वंदे भारत ट्रेन'ला हिरवा झेंडा दाखवला

पंतप्रधान मोदींनी मराठीमध्ये संवादाला सुरुवात करत वंदे भारत ट्रेन समर्पित करताना अत्यंत आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या

महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आणि कार्यालयात जाणारे लोक, शेतकरी आणि भाविक यांना याचा फायदा होईल असेही ते म्हणाले

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले

तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या किमयेमुळे हे साध्य झाल्याचे मत व्यक्त केले.

त्यानंतर त्यांनी बोहरा मुस्लिम समुदायाचे अलजेमा-तूस-सैफी संकुलाचे उद्घाटन केले