पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'वंदे भारत'ला दाखवला हिरवा झेंडा; २२ दिवसांत दुसऱ्यांदा मुंबई दौरा

आज मुंबईच्या सीएसएमटी स्थानकातून पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री, रेल्वेमंत्री तसेच इतर केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'वंदे भारत'ला दाखवला हिरवा झेंडा; २२ दिवसांत दुसऱ्यांदा मुंबई दौरा
Published on

आज मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकसाथ दोन 'वंदे भारत एक्सप्रेस' ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. एक 'वंदे भारत एक्स्प्रेस' सीएसएमटीवरून साई नगर शिर्डीला तर दुसरी सीएसएमटीवरून सोलापूरला रवाणा झाली. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी यावेळी हजारो मुंबईकरांनी गर्दी केली होती. तसेच, संपूर्ण मुंबईमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. 'वंदे भारत' सोबतच त्यांनी मुंबईतील अनेक विकासकामांचे लोकार्पण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी मुंबईकरांशी मराठीमध्ये संवाद साधला. ते म्हणाले की, "रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना अत्यंत आनंद होत आहे." पुढे ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील पर्यटन आणि देवस्थळांना या वंदे भारत ट्रेनचा नक्कीच फायदा होईल.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, " पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन. महाराष्ट्रात सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महाराष्ट्रला १३ हजार ५०० करोड रेल्वेसाठी मिळाले हे पहिल्यांदा घडले. हे सरकार सामान्य लोकांचे सरकार आहे. हे फक्त केंद्राच्या पाठिंब्यामुळे झाले." अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कोणी कल्पाना केली नसेल भारतात अशा प्रकारची गाडी धावेल. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या किमयेमुळे हे साध्या झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव इतिहासात लिहले जाईल." असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

logo
marathi.freepressjournal.in