कोण आहे बिग बॉस १६चा विजेता एमसी स्टॅन?

प्रतिनिधी

पुण्याच्या चाळीतून आलेल्या एमसी स्टॅन जिंकला बिग बॉसचा सोळावा सीजन

पुण्यात चाळीत राहिलेल्या एमसी स्टॅनने संगीताच्या रॅप क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख बनवली आहे

एमसी स्टॅनचे 'वटा' हे रॅप चांगलेच प्रसिद्ध झाले, युट्यूबवर याला २३ मिलियनहुन जास्त व्हू्यूज आहेत

त्याचे खरे नाव अल्ताफ शेख असून 'तडीपार' या त्याच्या अल्बममुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला

२३ वर्षीय एमसी स्टॅन हा युट्यूब, गाणी आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो रुपये कमावतो

गरीब कुटुंबात जन्मलेल्या एमसी स्टॅनने अनेक अडचणींवर मात करत हे यश प्राप्त केले आहे

बिग बॉस १६ जिंकत त्याने आईचे स्वप्न पूर्ण केल्याची भावना व्यक्त केली