एप्रिल महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे एप्रिल महिना? जाणून घ्या...
एप्रिल महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य
Published on

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

कुंभ

कुटुंबातील प्रिय व्यक्तींच्या चिंता मिटतील

कुंभ ही स्थिर राशी आहे. त्याचप्रमाणे ती वायुतत्त्वाचीही रास आहे. बुद्धिवादी रास आहे. कठोर परिश्रम, बौद्धिकदृष्टीने घेणारी रास आहे. या राशीचे चिन्ह खांद्यावरती कुंभ घेऊन उभा असलेला मानव आहे. बुद्धिमान, कल्पक, रागीट, परोपकार अशी निसर्गतःच वैशिष्ट्य असतात. धनवान, कृपण, स्थिर विचारांचे कुंभ राशीचे जातक असतात.

शिक्षण : शिक्षणासाठी आपणास अनुकूल ग्रहमान लाभलेले आहे. कुंभ राशीच्या व्यक्ती कुशाग्र बुद्धिमत्तेच्या असतात. त्यात ग्रहमान अनुकूल असल्यामुळे आपणास कोणत्याही क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूलता लाभेल. मनासारखे यश मिळेल. कला व क्रीडा क्षेत्रातही आपण चमकू शकाल. उज्ज्वल यश मिळेल. परदेशगमनाच्या बाबतीत शिक्षणासंबंधी व परदेशातील शिक्षणासाठी मात्र जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. योग्य दिशेने झालेले प्रयत्न आपल्याला अपेक्षित यश मिळवून देतील.

पारिवारिक : कुटुंबात आपल्याला सध्याच्या काळात थोडे कडक धोरण स्वीकारावे लागणार आहे. आपल्या मताशी काही वेळेस कुटुंबातील सदस्य सहमत होणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर जमवून घ्यावे लागेल. काही महत्त्वाच्या निर्णयात आपणाला सबुरीचे धोरण स्वीकारावे लागेल अन्यथा घरात विनाकारण वादविवादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. योग्य नियोजन व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार आहेत. त्याचप्रमाणे शांतपणे निर्णय घेणे सुद्धा हिताचे ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मत विचारात जरूर घ्या.

नोकरी-व्यवसाय-धंदा : कौटुंबिक सौख्याच्या दृष्टिकोनातून हा कालावधी अत्यंत अनुकूल आहे. कुटुंबात सकारात्मक वातावरण अनुभवास मिळेल. कुटुंबातील प्रिय व्यक्तींच्या चिंता मिटतील. त्याचप्रमाणे कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्नही भेटतील. काहींचे विवाह निश्चित होतील. आपले आरोग्य सुधारेल. त्याचप्रमाणे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची प्रकृती चांगली राहील. कुटुंबात चहूकडून मोठ्या सुवार्ता मिळतील. व्यावसायिक आर्थिक कोंडी फुटेल. मात्र उत्तरार्धात आरोग्यविषयक पथ्य पाळा. प्रवासात जपा. खाण्यापिण्याकडे लक्ष असू द्या तसेच वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे हितकारक राहील. आपण कार्य करीत असलेल्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल. नवनवीन संधी चालून येतील. आळस झटका. नोकरीमध्ये ज्या जातकांची प्रगती अथवा पदोन्नती थांबल्यासारखी झाली होती अशांची प्रगती होऊन पदोन्नती, वेतनवृद्धी होईल. या काळात आपल्या बुद्धीकौशल्याचा तसेच वाणीचा प्रभाव दिसेल. जीवनातील अपेक्षित सेवासुविधा मिळतील. कुटुंबातून सर्व सदस्यांचे वाढते सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. धार्मिक, सामाजिक क्षेत्रात आपली रुची वाढेल. हातून दानधर्म होण्याची शक्यता. धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग. गूढ विद्येविषयी उत्कंठा दाटून येईल. अध्यात्मिकतेमध्ये प्रगती करू शकाल.

शुभ दिनांक : २, ३, ४, १३, १४, १८, १९, २१, २२, २५, २६

अशुभ दिनांक : ५,७,१५,१६,१७,२०

एप्रिल महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य
आजचे राशिभविष्य,६ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मीन

नैराश्य जाईल

मीन ही द्विस्वभाव राशी आहे. त्याचप्रमाणे ही जलराशी आहे. मोक्ष त्रिकोणातील मीन ही रास आहे. या राशीचे चिन्ह दोन मासे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने त्यांची तोंडे आहेत. या राशीवर गुरूचे कारकत्व आहे. सतत द्विधा मनस्थिती या जातकांची बघायला मिळते. कोणतेही निर्णय पटकन घेऊ शकत नाहीत. आत्मविश्वासाची कधी कधी कमतरता जाणवते. अनामिक भीतीने घेरलेल्या असतात. जलपदार्थांची आवड असते. अल्पकामी तसेच मित्रांना अनुकूल, तेजस्वी, बलवान, धनधान्ययुक्त, विद्वान, सतत विचार करणारा अशी वैशिष्ट्ये मीन राशीच्या जातकांमध्ये पहावयास मिळतात. मीन राशीचे जातक कफ प्रकृतीचे असतात.

शिक्षण : शिक्षणासाठी या महिन्यात आपल्याला अनुकूल ग्रहमान लाभलेले आहे. त्याचा फायदा जरूर घ्या. स्वप्रयत्नांना अत्यंत चांगले फळ मिळेल. त्यामुळे प्रयत्न योग्य दिशेने करा व जास्त कष्ट घेतल्यास अपेक्षेपेक्षा जास्त यशाचे प्रमाण राहील. स्वतःच्या अतिरिक्त प्रयत्नांनी आपण यश खेचून आणू शकाल. धाडस व प्रयत्न तसेच जिद्द आपल्यामध्ये खूपच राहणार आहे. आपण सकारात्मक असल्यामुळे सर्वच क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूलता मिळून चांगले यश संपादित करू शकाल. परदेशासाठी अनुकूलता असली तरी थोडे जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. कला व क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली संधी मिळण्यासाठी अजून थोडी वाट बघावी लागू शकते.

पारिवारिक : परिवारात कधी गोड तर कधी कडू असे अनुभव आपल्याला मिळू शकतात. संमिश्र प्रकारचे वातावरण राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये काही वेळेस मतभेद आढळून येतील, तर कधी खूपच चांगले संबंध राहतील. फक्त एकमेकांना समजून घेण्याची गरज राहील. याबाबतीत आपण पुढाकार घेतल्यास कुटुंबातील शांतता टिकून राहून परिवारातील वातावरण आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नांना यश लाभेल. आर्थिक दृष्टिकोनातून अनुकूल कालावधी आहे. त्यामुळे समाधानी वातावरण राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल.

नोकरी-व्यवसाय-धंदा : आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली राहून अनपेक्षित धनागमन. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येऊन नैराश्य जाईल. नोकरीविषयक प्रश्न मिटतील. त्याचप्रमाणे काही नवीन संकल्प घ्याल. आपल्या कला छंदातून उत्पन्न मिळू शकते. कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धीसह उत्पन्नात वाढ होईल. बाहेरील मार्गातून धनलाभ होऊ शकतो. त्याचबरोबर परदेशी संबंधात वृद्धी होऊन नव्याने संबंध प्रस्थापित होऊ शकतात. आयात व निर्यात क्षेत्रात चांगली प्रगती होईल. फायद्याचे सौदे हाती येऊन नवीन करार होऊ शकतात. हॉटेल व्यवसायाशी निगडित असलेल्या जातकांना विशेष फायदा होईल. व्यवसायात तेजी येईल. उत्पन्नात वृद्धी. कॉर्पोरेट विभागाशी जोडले गेलेल्या जातकांना अन्य शहरात आपला व्यवसाय सुरू करता येईल. जे विद्यार्थी परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगून होते अशांचे स्वप्न साकार होऊ शकते. घरातून तसेच गुरुजनांकडून मदत मिळेल.

शुभ दिनांक : २, १०, ११, १८, १९, २१, २२, २३, २८, २९, ३०

अशुभ दिनांक : ५,७,१५,१६,१७,२०

logo
marathi.freepressjournal.in