

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
मेष
यशोवर्धक कालावधी
मेष रास ही अग्नितत्त्वाची रास आहे. त्याचप्रमाणे पुरुषप्रधान राशी आहे. ही राशी मेंढ्याच्या प्रवृतीची आहे. या राशीवर धडाडीचे लोक आढळतात. अत्यंत स्पष्टवक्ते आणि घेतलेले काम तडीस नेणारे असतात. धाडस, महत्त्वाकांक्षा हे या राशीचे विशेष गुण आहेत. या राशीचे चिन्ह मेंढा आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांमध्ये मेंढ्याप्रमाणे विशेष गुण आढळतात. कोणत्याही कार्यात त्यांची धडक देण्याची प्रवृत्ती असते. एखाद वेळेस असे जातक बंधूद्वेषी असू शकतात. भटक्या, रागीट, वादविवाद करणारा, मानी, शूर, कडक स्वभावाचा, गुडघ्यात अशक्त, पराक्रमी, अस्थिर, संपत्ती, परंतु इतरांना आवडणारा असा असतो. पित्त प्रकृती असते, तोंडाची ठेवण उभट व निमुळती असते.
शिक्षण : शिक्षणात चांगले यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची जोड हवी. त्याचप्रमाणे अभ्यासामध्ये सातत्य हवे, मन शांत असावे तसेच लक्ष केंद्रित करूनच अभ्यास केला गेला पाहिजे. अभ्यासात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. त्यासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे हे लक्षात ठेवावे. आत्मविश्वासाने व सातत्याने अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळवू शकाल तसेच अभ्यास झाल्यास शिक्षणातील कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकाल. कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगले यश येईल. परदेशासंबंधीचे शिक्षणात चांगले यश मिळू शकते. इतरांची मदतही मिळेल, परंतु स्वतःचे प्रयत्न प्रामाणिकपणाने करणे गरजेचे आहे.
पारिवारिक : घरातील वातावरण चांगले व आनंददायी असेल. घरात उत्तम आर्थिक आवक असणार आहे. नेहमीच्या उत्पन्न मार्गाशिवाय इतर मार्गानेही घनागमन होऊ शकते. घरातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकाल. त्यामुळे घरात समाधानाचे वातावरण राहील. सहकुटुंब प्रवासाची शक्यता आहे. घरात एखादे मंगलकार्य सुद्धा घडू शकते. आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आपल्याला वाढते सहकार्य लाभणार आहे.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : नोकरी, व्यवसाय धंदा - आपल्या हातातील कामे कमीत कमी प्रयत्नात पूर्ण होत असलेले बघून आश्चर्य वाटेल. विशेषतः सरकारी कामे विनासायास होत राहतील. ओळखी, मध्यस्थी यशस्वी होतील. मित्रमंडळींच्या वर्तुळातून तसेच कुटुंबातून कामे पूर्ण करण्याकरिता मदत मिळेल. व्यवसाय-धंद्यातील रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. व्यवसाय-धंद्यात नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी होईल. त्याचप्रमाणे व्यावसायिक उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल. आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. त्यामुळे आपण व्यवसाय विस्ताराच्या योजना आखू शकाल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतात. नोकरीमधील वातावरण सर्वसाधारण राहील. इतरांचे सहकार्य मिळतच राहील. कुटुंबात ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल. विशेषतः गर्भवतींनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे अपरिहार्य ठरेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात केंद्रित होऊ शकते.
शुभ दिनांक : २, ३, ४, १०, ११, १३, १४, १८, १९, २१, २
अशुभ दिनांक : ५, ७, १५, १६, १७, २०
वृषभ
वैयक्तिक मानसन्मान
वृषभ रास ही स्थिर रास आहे. त्याचप्रमाणे ती पृथ्वीतत्त्वाची रास आहे. कलेची आवड असणारी अशी ही स्त्रीप्रधान रास आहे. सातत्याने कार्य करणारी तसेच सौंदर्याची आवड असणारी ही रास आहे. या राशीचे चिन्ह बैल आहे. त्यामुळे बैलाच्या स्वभावातील गुण या राशीच्या जातकामध्ये आढळतात. कष्ट करण्यास ते सदैव आघाडीवर असतात. कार्याला महत्त्व देणे हे यांच्या स्वभावातच असते. ही रास अर्थत्वाची आहे. बैल, गाय, शेळ्या, मेंढ्या पाळणारा, देव, ब्राह्मण, गुरू, माता-पिता भक्त, शांत व स्थिर बुद्धीचा, वादविवादपटू, सुंदर व दैववान, कामुक, प्रिय भाषी, गुणवान, धनवान, सर्वांना आवडणारा, परंतु लोभी. वृषभ रास असणाऱ्या जातकांचे खांदे मांसल व भरदार असतात. त्यांची वात प्रकृती असते. त्याचप्रमाणे हे जातक कुटुंबवत्सल असतात.
शिक्षण : सध्याच्या काळामध्ये आपल्याला शिक्षण क्षेत्रातल्या कोणत्याही क्षेत्रात घवघवीत यश मिळू शकते, परंतु त्यासाठी आपल्याला प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करायला हवे. त्याचप्रमाणे अभ्यासात सातत्य हवे. प्रयत्नशील राहिल्याने व अभ्यासात सातत्य राहिल्याने आपण यश संपादित करू शकाल. आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना मात्र जास्त प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे न कंटाळता प्रयत्न चालू ठेवणे आपल्या हातात आहे हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करता येईल. परदेशी शिक्षण घेणाऱ्या जातकांना अपेक्षित यश मिळेल.
पारिवारिक : कुटुंबामध्ये कमी-जास्त प्रमाणात गैरसमज होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये एक गोपाळ टिकवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील. आपले प्रयत्न यशस्वी होतील. विशेषतः बहीण- भावंडांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लहानसहान वादविवादांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. आपल्या मताला विशेष प्राधान्य लाभेल. त्यामुळे घरात शांतता टिकवण्यासाठी आपण यशस्वी व्हाल. काही वेळेस अध्यात्मिक प्रयत्नांनी सुद्धा घरातील वातावरण चांगले राहू शकते.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : समाजातील निरनिराळ्या घटकांमधून आपल्याला वैयक्तिक मानसन्मानाचा लाभ होऊ शकतो. एखाद्या समारंभात मानाचे स्थान भूषवू शकाल. धार्मिकता व समाजसेवा याकडे कल असेल. त्यामध्ये आपण सक्रिय योगदान द्याल. राजकीय व्यक्तींना विशेष फायदा मिळू शकतो. आपण पूर्वी केलेल्या नियोजनामध्ये सफलता प्राप्त करू शकाल. तुमच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. व्यवसाय-धंद्यातील नवीन केलेले बदल आपल्यासाठी उपयोगी पडू शकतात. तुम्ही मिळविलेल्या कामातून चांगला फायदा मिळेल. व्यवसाय- धंद्यातील उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी झालेली अनुभवता येईल. त्याचप्रमाणे नवनवीन व्यवहार मोठ्या उत्साहाने करू शकाल.एक प्रकारची व्यावसायिक तेजी जाणवू शकते तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुख सुविधा वाढतील आरामदायी वस्तूंची खरेदी करू शकाल तुमचे आणि कुटुंबाचे स्थान उंचावण्या साठी अनुकूलता लाभणार आहे अध्यात्मिक क्षेत्रात आपण स्वतःची प्रगती करू शकाल दैवी प्रचिती येईल.
शुभ दिनांक : २, १०, १३, १४, १९, २१, २२, २३, २५, २६, २८, २९, ३०
अशुभ दिनांक : ५, ७, १५, १६, १७, २०