ऑगस्ट महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे ऑगस्ट महिना? जाणून घ्या...
ऑगस्ट महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य
Published on

डॉ.सविता महाडीक, ज्योतिष भूषण

कुंभ रास

निरनिराळ्या लाभांनी लाभान्वित व्हाल

कुंभ राशीच्या व्यक्ती जे ठरवतात ते मिळवतात. अशा व्यक्तिमत्त्वामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांच्यासाठी कोणतीही कामं लहान किंवा मोठी नसतात. ते काम उत्साहाने पार पाडतात. त्यामुळेच त्यांना कामात यश मिळते. जे काम करायचे आहे त्याचे नियोजन ते अगोदर करतात. ते पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे परिश्रम प्रामाणिकपणे घेतात. आर्थिक, मानसिक, शारीरिक ज्या प्रकारे शक्य असेल त्या प्रकारे कष्ट घेतात. त्यामुळे त्यांना यश मिळते. स्वतःचा अभ्यास व बुद्धी यामुळे तंत्रज्ञान, आधुनिक विज्ञान, शोधवृत्ती यात प्रावीण्य मिळवतात. त्यांना अध्यात्माची आवड असते. त्यातही ते ज्ञान प्राप्त करतात. त्यामुळेच इतर जण त्यांच्याकडे आकर्षित होतात. कुंभ राशीचा अंमल त्यांच्यावर असतो. कल्पनाशक्ती, तत्त्वज्ञानी संग्रहक वृत्ती, दूरदर्शीपणा असतो. तसेच त्यांना सरकारी नियम व कायद्यांचा अभ्यास असतो. ते इमानदार, परोपकारी असतात हे निश्चित. विचार, जिज्ञासा, आत्मविश्वास, शांत, बुद्धिमान, परोपकारी, गूढ विद्येची आवड असणारे, स्वतंत्र विचार करणारे, कठोर, उदार, स्पष्टवक्ता, धूर्त, विद्वान, प्रेम करणारे, असे गुण या राशीमध्ये असतात. कुशाग्र बुद्धी, उत्तम स्मरणशक्ती, संवेदनाशील, मानसशास्त्राची आवड, आत्मविश्वास असतो. इतर कोणाबरोबरही ते समझोता करत नाहीत. बोलण्यात किंवा वागण्यात कठीण असू शकतात. तसेच निराशही होतात. मोक्षाकडे त्यांची ओढ असते. हट्टी त्याचप्रमाणे निराशही लवकर होतात. कठोर वृत्ती असे दुर्गुणही आहेत.

शिक्षण :- कोणत्याही प्रकारच्या शिक्षणासाठी हा कालावधी अत्यंत उपयुक्त आहे. अभ्यास चांगला होणार आहे. मन एकाग्र करू शकाल. त्यामुळे अभ्यास चांगला होईल. फक्त वेळेचे नियोजन करा. इतरत्र वेळ वाया घालवू नका तसेच कुसंगतीपासून दूर राहा. एकाग्रतेने अभ्यास होईल. त्यासाठी अनुकूल काळ आहे. जे विद्यार्थी स्पर्धापरीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठीही अनुकूल कालावधी आहे. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील. परदेशातूनही संधी मिळू शकतात. एकूणच हा कालावधी शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत अनुकूल आहे, मात्र प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.

पारिवारिक :- कुटुंबातील सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद होऊ शकतात. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मताला प्राधान्य दिल्यास मतभेद होणार नाहीत. त्यामुळे वादविवादही टळू शकतील. कुटुंबातील शांतता टिकवण्यासाठी आपणाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. खर्च व जबाबदाऱ्या वाढताना दिसतील. अर्थशास्त्रासाठी संयम आणि योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. कोणताही निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचे मत लक्षात घ्या. आर्थिक निर्णय विचार करून घेणे आवश्यक आहे. घरातील शांतता टिकवण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- या कालावधीच्या पूर्वर्धात अचानक आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच नोकरी, व्यवसायात आपल्याला अचानकपणे उद्भवलेल्या समस्यांना अथवा प्रश्नांना तोंड द्यावे लागेल. परंतु या समस्या आपण स्वकर्तृत्वाने सोडवू शकाल. त्यावर मात कराल. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात भर पडेल. काही महत्त्वाचे निर्णय धडाडीने घ्याल. आपले निर्णय अचूक ठरतील. परंतु कोणतेही लहान-मोठे निर्णय शांत व पूर्ण विचारांती घेणे गरजेचे ठरेल. आपण केलेल्या जुन्या गुंतवणुकी चांगला आर्थिक परतावा मिळवून देतील, परंतु नवीन गुंतवणूक करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायला विसरू नका. ते हिताचे ठरेल. आपल्या व्यवसाय, धंद्यात व्यवहार करताना जागरूक राहा. फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. कोणाच्याही गोड बोलण्याला फसू नका. त्याचप्रमाणे अल्पपरिचित व्यक्तींपासून सावध रहा. उधारी वाढवणे धाडसाचे ठरेल. चालू नोकरीमध्ये सर्वसामान्य कालावधी आहे. वरिष्ठांच्या मताला उचित प्राधान्य देणे हिताचे ठरेल. काही वेळेस अनपेक्षित घटना घटित होऊन आपले रोजचे जीवनमान बदलले जाण्याची शक्यता आहे, पण हे बदल सकारात्मक राहतील. त्यामुळे उच्च जीवनमान मिळेल. सामाजिक जीवनामध्ये काही वेळेस मानवी विरोध सहन करावा लागेल. त्यामुळे आपण वर्तणुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

शुभ दिनांक : - ६, ७, १४, १९, २०, २४, २५, २६, २८

अशुभ दिनांक : - २, १३, १६, १८, २१, २२, २३, ३०, ३१


मीन रास

चढत्या क्रमाने शुभ फळे मिळतील

मीन राशीच्या व्यक्ती कोणत्याही कार्यामध्ये भावनांना जास्त महत्त्व देताना दिसतात. या राशीचे लोक भावनाशील व सौम्य असतात. या राशीचे वर्चस्व पावलांवर आहे. कर्तृत्वापेक्षा भावनांना महत्त्व देणारी ही रास आहे. थोडेसे भयभीत असणारे, दयाळू, इमानदार व परोपकारी असतात. मधुर, आकर्षक, स्नेहपूर्ण, सत्यवादी, समजदार, क्षमाशील, विचारशील, थोडे विसरभोळे. त्यांच्याकडे तरल कल्पनाशक्ती असते. समाजसेवा करणारे गुरू व ईश्वरावर श्रद्धा असते. वेळेनुसार किंवा परिस्थितीनुसार बदलणारे असतात. चांगला स्वभाव, मानवता व जनहितवादी असतात. अनुकरणप्रिय विनम्र, चंचल, सौम्य, सभ्य असे गुणदोष मीन राशीच्या व्यक्तींमध्ये दिसतात, तसेच त्यागी, दयावान, दुसऱ्यांना मदत करणे, दुसऱ्या व्यक्तीला सहजतेने समजून घेतात व म्हणूनच पूर्णत्वाची राशी आहे. मोक्षाकडे वाटचाल करणारी ही रास आहे. सत्संग, विवेकबुद्धी, शालिनता, नैतिकता या गोष्टींना प्राथमिकता देतात. घर व गूढ गोष्टी जास्त आवडतात. घर स्वच्छ ठेवणे, अध्यात्माची आवड असते. पण सतत मनामध्ये संभ्रम असतो. निर्णयक्षमता कमी असते. निर्णय घेण्यासाठी कोणाची तरी मदत लागते. इतरांवर अवलंबून असतात. त्यामुळे कामात गती कमी असते. कार्यात ताण निर्माण होतो. बऱ्याचदा निर्णय चुकतात. त्यामुळे त्याचे परिणाम भोगावे लागतात. विपरीत परिस्थितीत धैर्य कमी पडते. यांना कोणाचा ना कोणाचा तरी आधार आवश्यक असतो. आत्मविश्वासाची कमी असते.

शिक्षण :- शिक्षणासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या शिक्षणामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. परंतु प्रामाणिक कष्टाची व परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे, तसेच काहींना अडचणी येण्याची शक्यता आहे. पण आपल्या प्रयत्नाने व इच्छाशक्तीने सर्व प्रश्न योग्य रीतीने सोडवू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना पण अनुकूल काळ आहे. परदेशात संधी मिळण्यासाठी अजून वाट बघावी लागेल. परंतु आपले प्रयत्न योग्य दिशेने राहिल्यास परदेशी आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळू शकतात.

पारिवारिक :- कुटुंबात लहानसहान कारणावरून वादविवाद व मतभेद होऊन कलहसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे घरातील वातावरण तापलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच काहीना काही अडचणी आयत्या वेळेस उद्भवण्याची शक्यताही आहे. पण निराश होण्याचे कारण नाही. आपल्या प्रयत्नाने व सकारात्मक दृष्टिकोनाने आपण या समस्यांवर मात करू शकाल. कुटुंबातील ज्येष्ठांची मदत मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. आर्थिक नियोजन उपयोगी पडेल. आपल्या प्रयत्नाने योग्य परिस्थिती निर्माण करू शकाल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- या कालावधीमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात कायदेशीर बाबतीत जपण्याची जरुरी आहे. कारण तुम्ही कायदेशीर बाबीत अडकण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांना त्यांच्या कायदेशीर बाजू महत्त्वाच्या ठरतील. कायद्याच्या चौकटीत राहून आपले कार्य पूर्ण करा, म्हणजे त्रास होणार नाही. विशेषतः सरकारी कामांमध्ये आवर्जून कायदेशीर बाबी पाळा. वाटल्यास इतरांची मदत घ्यावी लागल्यास ती अवश्य घ्या. तसेच सरकारी नोकरीमध्ये लहानमोठ्या प्रलोभनांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला प्रलोभने दाखवून आपला कार्यभाग साधण्याचा हितशत्रूंचा डाव असू शकेल. त्यामुळे तुम्ही मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या अधिकाराच्या सीमेत राहून आपली कार्य पूर्ण करा. त्याचप्रमाणे आपल्या जबाबदारीचे भान ठेवा. त्यामुळे तुमचे भविष्यातील त्रास कमी होऊ शकतील. कायदेशीर अडचणींना तुम्हाला तोंड द्यावे लागणार नाही. कार्यालयात काम करताना वरिष्ठांच्या मताला प्राधान्य दिल्यास ते हिताचे ठरेल. तुम्ही वरिष्ठांचा आदर राखून आणि प्रत्येक बाबी त्यांच्या कानावर घालाव्यात. काहींना वास्तुयोग आहे. आपल्या मालकीच्या घरामध्ये प्रवेश करू शकाल. उत्तरार्धात शुभ ग्रहमान. त्यामुळे चढत्या क्रमाने शुभ फळे मिळतील. आपल्याजवळील मौल्यवान वस्तू सांभाळा. चोरी अथवा नुकसानीचे भय आहे.

शुभ दिनांक : ६, ८, ९, १४, १७, २४, २५, २६, २७, २८

अशुभ दिनांक : २, १३, १६, १८, २१, २२, २३, ३०,३१

logo
marathi.freepressjournal.in