ऑगस्ट महिना कसा जाईल? बघा तूळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे ऑगस्ट महिना? जाणून घ्या...
ऑगस्ट महिना कसा जाईल? बघा तूळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य
Published on

डॉ.सविता महाडीक, ज्योतिष भूषण

तूळ रास

विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील

तूळ राशीच्या जातकांच्या स्वभावात दिसून येते. अत्यंत मितव्ययी, बुद्धिमान, न्यायप्रिय असतात. त्यांना अन्याय सहन होत नाही, तर दुसऱ्या बाजूने विचार केल्यास अत्यंत गोड बोलणारे, सहसा कोणालाही न दुखवणारे, त्याचबरोबर आकर्षित करून घेणारे असतात. विविध गोष्टींचे अथवा क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान असते. एकच व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी ठरून आपले कार्य करू शकते. प्रत्येक गोष्टीत त्यांना सौंदर्य शोधण्याची सवय असते. विपरीत परिस्थितीत योग्य निर्णय घेणे ही त्यांची विशेषता असते. त्यांच्याकडे योग्य निर्णयक्षमता व परिस्थितीला योग्य रीतीने सामोरे जाऊन प्रश्न सोडवण्याचे कसब असते. संतुलन ठेवून सगळ्यांशी समान न्यायाने वागणे हे तूळ राशीचे वैशिष्ट्य आहे. सत्याचा पाठपुरवठा करणे तसेच व्यापार व व्यावसायिक वृत्ती त्यांच्यात असते. त्यामुळे ते व्यवसाय, धंद्यात यशस्वी होताना दिसतात. दयाळू, बुद्धिमान असून मौजमस्ती करणाऱ्याही असतात. सदैव प्रसन्न असतात, गोड बोलणे तसेच इतरांशी मधुर व्यवहार असतो. कविता, नाटक, सिनेमा तसेच अध्यात्माचा सुंदर संगम असतो. उत्तम श्रोते असतात. यांची ग्रहणशक्ती चांगली असते.

शिक्षण :- या काळामध्ये शिक्षण क्षेत्रात आपल्यासमोर काही वेळेस अचानक आव्हाने उभी राहू शकतात. या आव्हानांना एक संधी म्हणून स्वीकारा म्हणजे त्यात यश मिळेल त्याचप्रमाणे चालू शिक्षण घेत असलेल्या क्षेत्रात अडचणी निर्माण होऊ शकतात, पण या सर्व गोष्टींवर आपण मात करू शकाल. सातत्याने व नियमित अभ्यास झाल्यास चांगले यश प्राप्त करू शकाल. गुरूची चांगली साथ आहेच. त्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल, तर योग्य प्रयत्नांची व प्रामाणिकपणे कष्ट घेण्याची तयारी हवी. प्रयत्न अधिक करावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आळस करू नका. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. भाग्यकारक घटना घडू शकतात.

पारिवारिक :- काही वेळेस कुटुंबात वातावरण थोडे अशांत राहण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे आपापसातील मतभेद ठरू शकतात. मतभेदांमुळे वादविवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते टाळणे हिताचे ठरेल. त्याचप्रमाणे कुटुंबातील शांतता टिकण्यास मदत होईल. विशेषतः कुटुंबातील महिला वर्गाने आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. खर्चाचे प्रमाण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाढू शकते. आजारपणासाठी खर्चाची शक्यता आहे. नियोजनपूर्वक खर्च करणे गरजेचे ठरेल. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण ठेवण्याची जबाबदारी वाढणार आहे. कोणत्याही बाबतीत शांत व विचारपूर्वक निर्णय घ्या. यश निश्चित मिळेल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- नोकरी, व्यवसायात किंवा आपल्या कार्यक्षेत्रात कोणतेही कार्य करताना कायदेशीर बाबींचा प्रथम विचार करा. नियम व अटी पाळणे अत्यंत गरजेचे ठरेल. थोड्या फायद्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करू नका. नंतर त्याची किंमत चुकवावी लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भागीदारीच्या व्यवसायात वादविवाद करू नका. नवीन गुंतवणूक करताना डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. कोणतेही लहानमोठे आर्थिक निर्णय घेताना ते पूर्णपणे विचारांती घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कोणतेही मोठे व्यावसायिक साहस सध्यातरी करू नका. जर करायचे झाल्यास त्याचा दोन्ही बाजूंनी विचार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या क्षमतेचाही जरूर विचार करावा. पूर्वार्धात आपल्या कार्यक्षेत्रात अथवा आपल्या कुटुंबात काही वेळेस विचित्र परिस्थिती तयार होऊन खर्चात वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे काही वेळेस अशुभ समाचार मिळू शकतात. त्यामुळे मन:स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. शांत रहा. चालू नोकरीमध्ये वरिष्ठांबरोबर मतभेद होऊन वाद-विवाद होऊ शकतात. त्यामुळे आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांशी विनयशिलतेने वागा. कोणाचाही अपमान करू नका. कोणत्याही कार्यामध्ये वादविवादाचे प्रसंग घडू शकतात, ते सांभाळा. त्याचप्रमाणे वाहने सांभाळून चालवा. वेगावर नियंत्रण आवश्यक आहे. उत्तरार्धात शुभ ग्रहांच्या साथ संगतीमुळे वातावरण बदलेल. विशिष्ट महत्त्वकांक्षा पूर्ण होतील शुभ समाचार मिळतील.

शुभ दिनांक : - ६, ७, १४, १९, २०, २४, २५, २६, २८

अशुभ दिनांक : - २, ३, १६, १८, २१, २२, २३, ३०, ३१

वृश्चिक रास

सरकारी माध्यमातून लाभ

साध्यासुध्या बोलण्यात इतरांना टोमणे मारणे, आपल्या बोलण्यातून दुसऱ्याचा अपमान करणे अथवा अपमानास्पद वागणूक देणे ही वृश्चिक राशीच्या व्यक्तींची विशेषता असते. त्यांची वाणी अत्यंत उग्र असू शकते. अहंकार काठोकाठ असल्याने त्यांच्याशी लोक दोन हात अंतर ठेवून वागतात, पण त्या व्यक्ती सकाळपासून रात्रीपर्यंत कार्यमग्न असतात. सतत कार्यमग्न राहणे ही त्यांची विशेषता असते. ते उत्साही असतात. कोणत्याही नवीन गोष्टी पटकन शिकतात. आकलनशक्ती चांगली असते. या व्यक्ती बोलताना नेहमी नियम-अटी- कायदा याबाबतीत बोलत असतात. परंतु या व्यक्ती जरी वरून कठोर वाटत असल्या तरी त्यातून अतिशय कोमल असू शकतात. वृश्चिक म्हणजे विंचू. त्यांची विशेषता म्हणजे विषारी रहस्यमय एकांतप्रिय असतात. षडयंत्र, गुप्त गोष्टी, अभिमानी, महत्त्वाकांक्षी, साहसी, स्वतंत्रविचारी, परिश्रम घेणारे असतात. त्यांच्यात चैतन्य व प्रसन्नता असते. एकीकडे कठीण व एकीकडे प्रेमळ असा स्वभाव असतो. त्यांना भोजनाची आवड असते. त्याचप्रमाणे स्वभावात रागीटपणा, इच्छाशक्ती चांगली असते. वाईट गुण म्हणजे अविचारी मत्सर व पापी वृत्ती असेही दुर्गुण आढळतात.

शिक्षण :- चालू काळामध्ये आपल्याला कोणतेही शिक्षण घेताना अथवा कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण घेताना जास्तीचे कष्ट घेण्याची आवश्यकता आहे. जास्त परिश्रम घ्यावे लागतील तेव्हा यश मिळू शकेल. इतरांवर अजिबात अवलंबून राहू नको, तसेच वेळेचा अपव्यय नको. नियोजन उपयोगी पडू शकते. त्याचप्रमाणे योग्य वेळेस मार्गदर्शन घ्यावे. अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे हिताचे ठरेल. त्याचप्रमाणे अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. एकाच वेळेस अनेक कामे नकोत. सातत्य व एकाग्रतेने अभ्यास झाल्यास चांगले यश प्राप्त होईल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना भरभरून यश मिळू शकते. प्रदेशातील संधीसाठी मात्र सातत्याने प्रयत्न करण्याची गरज राहील.

पारिवारिक :- कुटुंब परिवारात वर सामंजस्याचे वातावरण जरी दिसून येत असली तरी आतमध्ये कुठेतरी त्यामध्ये उणीव असल्याची जाणीव राहील. आर्थिक बाबतीत कधी कमी जास्त जाणवण्याची शक्यता, आर्थिक चढ-उतार जाणवू शकतात. त्यामुळे कामाच्या क्रमवारीमध्ये बदल घडू शकतो. आपण आपल्या कुटुंब परिवारातील सदस्यांकडे जास्त लक्ष द्याल. त्यांच्या मागण्या पुरवण्याचा प्रयत्न कराल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येऊ शकतात. तसेच विवाह योग्य तरुण तरुणींचे विवाह निश्चित होऊ शकतात.

नोकरी-व्यापार- व्यवसाय :- या कालावधीच्या सुरुवातीस किंवा पूर्वार्धामध्ये काहीशी मिश्र फळे प्रतिपादित होण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात सावध राहा. कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना शांतपणे व पूर्ण विचारांती ते घेणे आवश्यक ठरेल. लहानसहान बाबींकडे दुर्लक्ष करू नका. ते नुकसानदायक ठरू शकते. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील तसेच भागीदारी व्यवसायात भागीदाराच्या मताला प्राधान्य दिल्यास ते व्यवसायासाठी पोषक ठरेल. उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते, तसेच व्यवसायात काही नवीन बदल करू शकाल. नवीन संकल्पनांचा वापर करू शकाल. त्यामुळे स्पर्धकांवर मात करता येईल. चालू नोकरीमध्ये काही अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आहे. वरिष्ठांबरोबर मतभेद होऊ शकतात. अशी शक्यता असली तरी वरिष्ठांशी मतभेद होण्याचे टाळणे अधिक हिताचे ठरणारे आहे. ते टाळण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे. वरिष्ठांबरोबर गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे कमी बोला. ते हिताचे ठरेल.

आपल्या कामाकडे लक्ष द्या. नोकरीत असताना शिस्त पाळा. त्याचप्रमाणे कुसंगत टाळा. व्यसने नको. व्यसनांमुळे नुकसानीला सोमोरे जावे लागू शकते. कुसंगतीतून त्रास उद‌्भवू शकतो हे लक्षात ठेवा तसेच वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आवश्यक आहे, तसेच वाहतुकीचे नियम पाळणे हिताचे ठरेल. दीर्घकाळ रखडलेले जमीनजुमला, स्थायी संपत्ती, वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी विषयातील वादविवाद संपुष्टात येतील. या विषयातील कामे गतिमान होऊन मार्गी लागतील. तरुण-तरुणींनी प्रेमप्रकरणांमध्ये सावध राहणे आवश्यक आहे.

शुभ दिनांक : ६, ८, ९, १४, १७, २४, २५,२६,२७,२८

अशुभ दिनांक : २, १३, १६, १८, २१, २२, २३, ३०, ३१

logo
marathi.freepressjournal.in