डॉ.सविता महाडीक, ज्योतिष भूषण
धनू रास
आशावादी रहाल
धनू राशीच्या व्यक्ती अत्यंत आकर्षक व प्रेरणादायी असतात. शारीरिक व मानसिक दृष्टीने त्या कणखरही असतात. अशक्य प्रकारची कामे करण्यास सदैव तयार असतात. दुसऱ्याची मदतही करतात. अशक्य कामे करणारी व्यक्ती या धनु राशीच्या असतात. शौर्य व धाडस या व्यक्तींमध्ये असतेच. सभ्य आणि विनम्र असतात. परंतु त्या समोरच्या व्यक्तीकडूनही तशाच अपेक्षा ठेवतात. अन्यायाविरुद्ध आवाजही उठवतात व अन्याय करणाऱ्यांना पराजित करतात. ही राशी सबळ असते. लढणे, संघर्ष, विजय मिळवणे, दुर्बलांना अभय देतात व त्यांना मदतही करतात. त्या अत्यंत अभिमानी असतात. त्यांना अध्यात्माची आवड असते. न्यायप्रिय, भाग्य महत्त्वाकांक्षी असते. त्या आशावादी असतात. त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धी असते. सदैव उत्साही, मानवतावादी, धर्माभिमानी, कर्तव्य तत्परता, न्यायप्रियता, भरपूर आत्मविश्वास, मात्र शक्ती व बुद्धीचा अहंकार असतो. अति आत्मविश्वास हा सुद्धा दुर्गुण निर्माण करू शकतो. त्या स्वकेंद्रित असतात.
शिक्षण :- सदरचा कालावधी शिक्षणासाठी आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासारखा आहे. अभ्यासात सातत्य व लक्ष एकाग्र करणे आवश्यक आहे. आपल्यात अभ्यास करण्याची वृत्ती राहणार असून, मनोरंजनाकडेही कल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल. अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिल्यास यश मिळेल. ग्रहांचीही साथ लाभेल. प्रदेशातील शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. क्रीडा, कला क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळणार आहे. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील, मात्र योग्य प्रयत्न पाहिजेत. प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यास उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल होईल.
पारिवारिक :- कुटुंबात थोडे मतभेद असण्याची शक्यता आहे. आपणास याबाबतीत लक्ष द्यावे लागणार आहे, तसेच नातेवाईकांशी संबंध सुद्धा ताणले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहानसहान कारणांवरून मतभेद निर्माण होऊन कलहसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतभेद टाळणे हितकारक ठरेल. त्याचप्रमाणे कुटुंबात शांतता टिकण्यास सहाय्य होईल. आपण या कामी पुढाकार घेतल्यास आपणास त्यात यश मिळेल. परिवारात अधिक जबाबदारी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती ठीकठाक राहिल्यामुळे आपण कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मागण्या पूर्ण करू शकाल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- या काळामध्ये सुरुवातीपासून आपण आशावादी राहाल. नोकरी, व्यवसायात अर्थात आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला नवीन संधी उपलब्ध होतील. त्या संधीचा फायदा कसा घेता येईल याच्या विचारात आपण असाल. या संधीचा उचलण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करावी. त्यामुळे आपण दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लावू शकाल. सरकारी कामात यश मिळू शकेल. यासाठी ओळखी, मध्यस्थी उपयोगी पडेल. व्यक्तिगत कारणासाठी अथवा कार्यक्षेत्रातील कारणांमुळे जवळचे तसेच दूरचे प्रवास घटित होण्याची शक्यता आहे. प्रवास कार्य सिद्ध राहतील. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला स्त्रीकडून सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात आर्थिक गरज लागल्यास ती मिळेल. मित्रमंडळींच्या वर्तुळातून अथवा कुटुंबातून मदत मिळू शकेल. नियोजन पूर्ण होत असलेले बघून आपण आशावादी राहाल. कुटुंबातील तरुण-तरुणींचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येईल. त्यांना नोकरी मिळू शकेल. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती यशस्वी ठरून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. प्रेमीयुगुलांना अनुकूल कालावधी. प्रेमामध्ये यश संपादित कराल. नवे मित्र जोडाल. स्वतःसाठी चैनीच्या वस्तू खरेदी करू शकाल. आर्थिक परिस्थिती सुधारेल, मात्र सार्वजनिक जीवनातून काही वेळेस समस्या उभ्या राहू शकतात. आपल्या वर्तणुकीवर तसेच बोलणे व वागण्यावर नियंत्रण ठेवा. क्रिया-प्रतिक्रिया सांभाळा. चालू नोकरीमध्ये परिस्थिती सर्वसामान्य राहील. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणांचे विवाह निश्चित होतील. काही अविस्मरणीय प्रसंग घटित झाल्यामुळे आपले रोजचे जीवनमान बदलू शकेल. यासाठी आपण आपल्या इच्छित दैवतांची पूजा अर्चा करावी.
शुभ दिनांक : - ६, ७, ९, १०, ११, १४, १७, १९, २४, २८
अशुभ दिनांक : - २, १३, १६, १८, २१, २२, २३,३०, ३१
मकर रास
संमिश्र फळ मिळेल
आपल्या कर्माला प्राधान्य देणाऱ्या व्यक्ती म्हणजे मकर राशीच्या होय. त्यांना आपण कर्मयोगी म्हणू शकतो. त्यांची कर्मावर निष्ठा असते. एखाद्या उद्देशासाठी कार्य करून ते पूर्ण करणे, त्यातील अडचणींना पूर्णपणे सोडून ते काम यशस्वी करणे, परिश्रम करणे हे त्यांचे कर्मच आहे. त्यात त्यांना आनंद मिळत असतो. आपल्या कार्यात कार्यमग्न असतात. इतर गोष्टींकडे त्यांचे फारसे लक्ष नसते. परिश्रमाचे व परिश्रम केल्याचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर असते. ते आत्मनिर्भर असतात. स्वतःचे काम स्वतः करण्याकडे त्यांचे लक्ष असते. ते स्वतःच्या मनाचे राजे असतात. कामाच्या बाबतीत दृढता असते. चंचल, भावनाशील आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात. त्या सहनशील असतात, पण थोड्या कंजूस देखील असतात. आत्मनिर्भर, एकांतप्रिय चिंतन करणे, त्यातून नवीन मार्ग काढणे असे त्यांचे वैशिष्ट्य असते. उच्च प्रकारची निष्ठा त्यांच्याकडे असते. उच्च महत्त्वाकांक्षा व कष्ट यांचा सुवर्ण संगम आहे. म्हणून त्या कठीण काम पूर्ण करणाऱ्या असतात. त्यांचे शांत व मुद्देसूद बोलणे असते. नम्रतेचा व्यवहार त्यांच्यात असतो. चुकीच्या गोष्टींची शिक्षा भोगण्याची तयारी असते. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सातत्याने कष्ट घेत असतात. तेजस्वी जिद्दी, इच्छा असते. अधिक चिकित्सक. कधी कधी जास्त बोलणे होऊ शकते. अति विचाराने, मूर्खपणाने निर्णय घेतल्याने ते चुकतात. वैराग्य, निराशावादी, उदासीन काही गोष्टी मनाला लागतात. त्यांच्यात अधिक विचार करणे हे दुर्गुण असू शकतात.
शिक्षण :- शिक्षणासाठी अनुकूल कालावधी असला तरी आपणास जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्या योग्य प्रयत्नानंतरच यश मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना पण हेच सांगणे आहे. परदेशातील शिक्षणासाठी पण आपणास योग्य प्रयत्नानंतरच यश मिळू शकते. प्रामाणिक कष्ट करण्याची गरज आहे. योग्य दिशेने केलेले प्रयत्न सफल होऊ शकतात.
पारिवारिक :- परिवारात जास्त काम करावे लागणार आहे. कुटुंबातील सदस्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक कष्ट घ्याल. कुटुंबातील जबाबदारीचे प्रमाण वाढणार आहे. आर्थिक बाबतीत काही वेळेस चढ-उतार जाणवण्याची शक्यता आहे. योग्य परिश्रम घेतल्यास यश निश्चितच मिळेल. काही ठोस निर्णय आपणास यश मिळवून देतील. आर्थिक बाबतीत योग्य प्रयत्न व धाडस यामुळे आपणास सर्व स्तरावर यश मिळेल. कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. कुटुंबातील मुला-मुलींचे प्रश्न सोडवावे लागतील. जबाबदाऱ्या वाढतील, पण आपण त्या पूर्ण करू शकाल. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न कराल. सर्व स्तरावर प्रयत्नाने यश प्राप्त होऊ शकेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- या कालावधीच्या सुरुवातीला असंगाशी संग टाळा. नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रमंडळींच्या वर्तुळात सावध असणे गरजेचे राहील. त्याचप्रमाणे नोकरी, व्यवसायात कोणतीही नवीन कामे स्वीकारताना त्याच्या दोन्ही बाजू तपासून बघा. नियम व अटींचे पालन करा. संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा तसेच आपल्या योग्यतेनुसार नवीन कामे स्वीकारा. अति आत्मविश्वास घात करू शकतो हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे इतरांवर अंधविश्वास ठेवू नका.
परिवारात वादविवादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या प्रसंगांमुळे वादविवाद निर्माण होतील अशा प्रसंगांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. कुटुंबातील शांतता टिकवण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. या कालावधीच्या उत्तरार्धात बऱ्याचशा समस्या असल्यास त्या सुटतील, दिलासा मिळेल. व्यवसाय- धंद्यात उधारी वसूल होईल. त्यामुळे आर्थिक बाजू बळकट होईल. चालू नोकरीमध्ये सर्वसामान्य परिस्थिती अनुभवाल, तरीपण नोकरीच्या ठिकाणी असलेल्या राजकारण व गटबाजीपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. ते हिताचे ठरेल. आपल्या कार्यक्षेत्रात जर काही कोर्ट केसेस चाललेल्या असतील, त्यामध्ये तडजोड स्वीकारा. त्यामुळे फायदाच होईल. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
शुभ दिनांक : - १०, ११, १७, १९, २०, २४, २६,
अशुभ दिनांक : १३, १६, १८, २१, २२, २३, ३०, ३१