आजचे राशिभविष्य, २ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 1, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी इतर कोणाचाही अपमान करू नये अथवा अपमानास्पद वागणूक देऊ नये ज्येष्ठांच्या सल्ल्यानुसार वागा.

वृषभ - शुभ अथवा चांगल्या वार्ता मिळून आपला उत्साह वाढेल मात्र धाडसी निर्णय टाळा अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो. धनलाभाचे योग.

मिथुन - आर्थिक चिंता मिटेल व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील मात्र कोणतेही लहान मोठे आर्थिक व्यवहार सावधानतेने करा घाईघाईत घेतलेले निर्णय चुकू शकतात.

कर्क - हातातील कामे झटपट पूर्ण होतील परंतु रोजच्या व्यवहारात सावधानता बाळगा फसवणुकीची शक्यता नवी गुंतवणूक नको. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल तसेच परदेशगमन संभवते.

सिंह - जुनी उधारी वसूल होईल नवीन उधारी करू नका भागीदाराच्या तसेच जोडीदाराच्या मतांना प्राधान्य द्या त्यातच आपले हित आहे हे लक्षात असू द्या.

कन्या - जुने हेवेदावे तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळातील व आप्तेष्ट नातेवाईक यांच्या मधील मतभेद दूर होतील. हातातील कामामध्ये चालढकल करणे नुकसान दायक ठरू शकते.

तुळ - सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस निर्माण होऊन एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यात सक्रिय योगदान द्याल त्यामुळे मानसन्मान मिळेल.

वृश्चिक - महत्त्वाच्या कामांसाठी जवळचे तसेच दूरचे प्रवास होऊ शकतात अनेक दिवस प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील मात्र व्यसनांपासून दूर राहा.

धनु - आपले बोलणे, वर्तणुकीवर नियंत्रण राखणे महत्त्वाचे ठरेल अतिआत्मविश्वास नको इतरांची मते लक्षात घेतल्यास फायदेशीर ठरतील.

मकर - लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगणे हिताचे ठरेल तसेच कोणतीही गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला उपयोगी पडू शकतो.

कुंभ - नोकरीच्या स्थळी बदल होऊ शकतो तसेच जबाबदारी वाढून कामाच्या स्वरूपातही बदल जाणवतील. वरिष्ठांशी मतभेद नको.

मीन - अध्यात्मिक ओढ जाणवेल गुढते कडे आकर्षित व्हाल. आपले छंद तसेच कलागुणांना वाव मिळेल प्रसिद्धी मिळून आर्थिक परिस्थिती सुधारेल.

logo
marathi.freepressjournal.in