आजचे राशिभविष्य, १ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 1, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - कोणतेही मोठे धाडस टाळा. कोणतेही वादग्रस्त परिस्थिती समोर आली तरी आपण शांत राहिले पाहिजे. व्यापार व्यवसायिकांना मात्र चांगली परिस्थिती असणार आहे.

वृषभ - कलाक्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाणार आहे नवीन संधी प्राप्त होतील. कला क्षेत्रामध्ये काही नवीन करून दाखवण्याची हीच वेळ आहे.

मिथुन - आपणास आज मानसिक मनोबल वाढवण्याची गरज आहे. काहीतरी गुप्त चिंता आपणास सतावणार आहे. आर्थिक नियोजन नीट करा, देण्याघेण्याचा व्यवहार करताना दक्षता बाळगा.

कर्क - कुटुंबातील सहजीवन आपणास सुखावून जाईल. राजकीय व्यक्तींनी दक्ष राहणे गरजेचे, नको त्या व्यक्तींकडून मानसिक त्रास होण्याची शक्यता. व्यापार व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील.

सिंह - आपणा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. घरामध्ये वैद्यकीय खर्च होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसात कर्जफेड किंवा कर्जवसुली करून घ्या.

कन्या - तरुण-तरुणींचे महत्वाचे प्रश्न सुटतील. नोकरी मध्ये शुभघटना घडतील. काम केल्याचे श्रेय मिळाल्या सारखे वाटेल. पगार वाढीची शक्यता आहे. शुभ ग्रहांचे भ्रमण आपणास फायदेशीर जाईल.

तुळ - आई वडिलांच्या प्रकृतीची चिंता वाटणार आहे. मानसिक ताण तणावाची शक्यता आहे. नैसर्गिक ग्रहांची साथ मिळाल्यामुळे आपण सर्व गोष्टीतून सहीसलामत बाहेर पडाल.

वृश्चिक - वैयक्तिक लेव्हल वर आपण गतिमान राहणार आहात. वादग्रस्त प्रकरण उद्भवण्याची शक्यता आहे, आपण त्यावर आपण व्यवस्थित मात कराल. छोटा मोठा प्रवास होऊ शकतो.

धनु - बेरोजगारांना नोकरी मिळेल. भागीदाराच्या प्रश्नातून काही त्रास झाले असल्यास त्यातून सुटका होईल. तरुणांचे भाग्योदय होणार आहे. आर्थिक लाभ होणार आहेत.

मकर - मानसिक शारीरिक आणि व्यावहारिक पथ्ये कटाक्षाने पाळा, बेकायदेशीर व्यवहार नकोत, अवसानघातकी निर्णय टाळा. उधारीचे व्यवहार जपून करा नोकरीमध्ये भाग्योदय होईल.

कुंभ - काही ग्रह आपणास विचित्र फले देण्याची शक्यता आहे. आपण सावध असावे. सार्वजनिक जीवनामध्ये सर्व पथ्ये पाळावीत. अनपेक्षित प्रवास संभवतो. अधिक पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकट नको.

मीन - विचित्रपणे आर्थिक कोंडी झालेली निघून जाईल. नोकरीमध्ये भाग्योदय होईल. व्यापार व्यवसायिकांच्या व्यवसायामध्ये तेजी निर्माण झाल्यामुळे, आर्थिक प्रश्न सुटून जाणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in