आजचे राशिभविष्य, १ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 1, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on: 

मेष - आजचा दिवस आनंदी जाईल, प्रवासाचे योग आहेत. प्रेमिकांना प्रेमप्रकरणात यश मिळेल वडिलार्जित संपत्ती बाबत काही विशिष्ट निर्णय होतील. महिलांना मैत्रिणी भेटतील.

वृषभ - आजचा दिवस जास्त कामाचा आहे त्यामुळे मनावर ताण येण्याची शक्यता आहे मन शांत ठेवा आणि मगच काम करा त्यामुळे कामाचा त्रास जाणवणार नाही आर्थिक देणी देऊन टाका.

मिथुन - जोडीदाराशी चांगले संबंध राहतील एखादे मोठे धाडसाचे काम हाती घ्याल आणि त्यात यश मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न कराल जुन्या आठवणीत रमाल मुलांच्या प्रगतीने आनंद वाटेल

कर्क - आई-वडिलांची काळजी घ्यावी त्यांच्या आरोग्याला जपणे आवश्यक आहे. कायदेशीर कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून घ्या या व्यापाऱ्यांनी महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करताना विचारपूर्वक करा.

सिंह - काहींना खूप लांबचे प्रवास करण्याचे योग आहेत प्रवास कार्य हे आर्थिक दृष्ट्या समाधान कारक राहील मोठी कामे मार्गी लावाल व्यापाऱ्यांना मोठे सौदे करण्यास हरकत नाही.

कन्या - खूप दगदग आणि धावपळ करावी लागेल प्रवास शक्यतो टाळा प्रवासात त्रास होऊ शकतो भाग्याची साथ मिळणार नाही जे काही करायचे आहे ते स्वतःच्या बळावर करावे लागेल.

तुळ - जोडीदाराची काळजी घ्यावी लागेल तसेच पती-पत्नी यांनी एकमेकांना दोष देणे थांबवावे काहींना जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल व्यापारात भागीदारीतील व्यवहार जपून करा.

वृश्चिक - स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे आजचा दिवस खडतर आहे जोडीदाराची काळजी घ्यावी मात्र व्यवसायात दिवस चांगला आर्थिक उलाढाली चांगल्या होतील.

धनु - मुलांना अभ्यासात मागे मार्गदर्शन करावे लागेल. त्यांच्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक त्यांना काय हवे नको ते जाणीव पूर्वक पहा. महिलांना कामाचा ताण जाणवेल.

मकर - दैनंदिन कामांमध्ये व्यस्त राहाल महत्त्वाची व मोठी कामे आज करून घ्या सरकारी कामात आपणास सहकार्य लाभेल मात्र कामाचा ताण येणार आहे वरिष्ठांना बरोबर वाद विवाद नकोत.

कुंभ - आजचा दिवस आपणास संपूर्ण आनंदात जाणार आहे महत्वाची काम सहजता कराल नशिबाची साथ लाभणार आहे त्यामुळे सहकाऱ्यांकडून सहकार्य व हाताखालील लोक साथ देणार आहेत.

मीन - मनावरील ताण कमी होणार आहे आर्थिक प्रॉब्लेम सुटणार आहेत जुनी येणी आल्यामुळे आनंद वाटेल घरामध्ये कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल.

logo
marathi.freepressjournal.in