आजचे राशिभविष्य, १ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 1, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - नवीन कामे स्वीकारताना थोडी काळजी घ्यावी. कामामध्ये सातत्य राहणार आहे. मात्र सहकार्‍यांकडून अपेक्षित सहकार्य मिळणे कठीण वाटते. आर्थिक प्राप्ती मात्र मनाप्रमाणे होणार आहे.

वृषभ - आपण पूर्वी घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल. कार्यक्षेत्र रुंदावेल. तसेच सर्वांचे सहकार्य लाभून महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. सरकारी स्वरूपाची कामे होतिल.

मिथुन -आजचा दिवस आपणास संमिश्र जाणार आहे. आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहणार आहात. धरसोड वृत्तीने वागणे आपल्याला त्रासदायक होईल. स्वतःच्या प्रयत्नांना प्राधान्य द्या.

कर्क -आपल्या मान:स्वास्थ्य थोडेसे बिघडणार आहे.मानसिक आणि शारीरिक विश्रांती दोन्ही घेणे गरजेचे आहे. कामामध्ये सहकारी व्यक्तींचे सहाय्यक घ्यावे लागणार आहे.

सिंह - व्यापार व्यवसायातील चढ उतारांवर आपण चांगल्या प्रकारे सामोरे जाणार आहात.आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या प्रकारे निर्णय होणार आहे. कार्यक्षेत्रात चांगले बदल करणार आहात.

कन्या -आपला आर्थिक आवाका विचारात घेऊन निर्णय घेतले, तर विवंचना वाढणार नाहीत. नवीन परिचय झालेल्या व्यक्तींवर अति विश्वास ठेवू नका. प्रकृती चे वेळापत्रक सांभाळा.

तुळ - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम वाढणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीसाठी थोरामोठ्यांचे आशीर्वाद उपयोगी पडणारा आहेत. व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहा.

वृश्चिक - आज आपणाला थोडे चतुराईने काम केले पाहिजे.नवीन जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी नियोजन आणि परिश्रम करावे लागतील. आपल्या परिश्रमाचे चांगले फळ मिळणार आहे.

धनु - मनात काळजीचे विचार राहणार आहेत.जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा आर्थिक आवक बऱ्यापैकी राहील जीवन जाते चांगली साथ देणार आहे. आर्थिक फायदे होणार आहेत.

मकर - आर्थिक उलाढाली जपून करणे आवश्यक आहे. नोकरीमध्ये संघर्ष टाळलेलेच चांगले. व्यापार व्यवसायातील निर्णय नीट घ्या अंदाज चुकण्याची शक्यता आहे. हित शत्रूंचा त्रास संभवतो.

कुंभ - लेखक आणि कलावंतांना चांगला दिवस आहे. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात अपेक्षित यश येणार आहे. नवीन कामाकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल.

मीन -आर्थिक घडामोडी निट झाल्यामुळे आपल्याला समाधान असणार आहे. व्यवसायातील आपले अंदाज बरोबर ठरणार आहेत. घरातील व्यक्ती आपल्या सल्ल्याचा मान ठेवणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in