आजचे राशिभविष्य, १० डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 10, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा. मन सैरभैर होण्याची शक्यता आहे हे कार्यमग्न राहून आपल्या कामात लक्ष ठेवणे हितकारक ठरेल इतरांचा फारसा विचार करू नका.

वृषभ - आज नशिबाची साथ लाभल्यामुळे महत्त्वाची व प्रदीर्घ काळ रखडलेली कामे प्रयत्न केल्यास आश्चर्यकारकरित्या पूर्ण होण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या कामात लक्ष द्या.

मिथुन - नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वाचे बदल घडून येतील. आपल्याला अपेक्षित असलेली संधी मिळू शकते मात्र आपले कामाविषयी चे ज्ञान अद्यावत ठेवा.

कर्क - कार्य निमित्त छोटे-मोठे प्रवास घडतील. चांगल्या लोकांच्या संपर्कात याल. जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे आनंदात दिवस जाईल.

सिंह - इतरांचा फारसा विचार न करता आपले मुद्दे ठामपणे मांडा. आपला अनुभव उपयोगी ला येऊ शकतो जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रसिद्धी मिळू शकते.

कन्या - आपल्या जोडीदाराला समजून घ्या. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराचे म्हणणे ऐकून घ्या. वाद-विवाद नको. अभ्यास चांगला होईल अपेक्षित यश मिळेल स्पर्धात्मक यश मिळू शकते.

तुळ - पूर्वी दिलेल्या नोकरी विषयक मुलाखती मधून नोकरी मिळू शकेल बेरोजगारांना रोजगार मिळवून नोकरीचा शोध संपेल. ओळखीतून कामे होतील.

वृश्चिक - कुटुंब परिवारात तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात आर्थिक कारणांवरून वाद-विवाद घडून कलह सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने वादविवाद टाळा.

धनु - घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलली जातील. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे हितकारक राहील. शांतपणे निर्णय घ्या.

मकर - एखाद्या चांगल्या सामाजिक कार्यात सक्रिय योगदान दिल्यामुळे समाजातील आपली पत प्रतिष्ठा वाढेल. दानधर्म तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल.

कुंभ - आपल्याला इतरांची मते पटली नाहीत तरी आपले बोलणे मृदू ठेवा. मनोरंजनाकडे कल राहून मित्रमंडळींच्या समवेत मौजमजेत वेळ जाईल. खर्चावर नियंत्रण आवश्यक.

मीन - अपेक्षित कामे झाल्यामुळे समाधानी राहाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जीवन साथी चे सहकार्य लाभेल. जवळचे प्रवास घडू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in