मेष - तुमच्या कलात्मक आणि सर्जनशील क्षमतेमुळे तुम्ही कौतुकाचे धनी होणार आहात. आजचा दिवस आनंदाने खुशीने परिपूर्ण अशा संदेशांनी भरलेला असणार आहे.
वृषभ - आपली महत्त्वाची कामे सुरळीत पार पडणार आहे. घरातील कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. घरातील वृद्ध व्यक्तीच्या जास्त आजारी आहेत त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मिथुन - प्रवासामध्ये महत्त्वाची कामे होणार आहेत. परदेशातून शुभ संदेश येण्याची शक्यता आहे. ज्या नात्यांना आपण महत्व देतात त्यांना त्यांना वेळ देणं फार आवश्यक आहे.
कर्क - आपल्या अचूक अंदाज हाच आपला महत्व पूर्ण गुण असणार आहे. महत्त्वाची कामे व प्रकल्प वेळेवर पूर्ण केल्याने व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे.
सिंह - दिवसाची सुरुवात आनंदाने करण्यासाठी तुम्हाला योगसाधनाच फार उपयोग होणार आहे. योगसाधनेमुळे आपला उत्साह दिवसभर राहणार आहे.
कन्या - आपले विचार आणि आपली कृती योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी वाद-विवाद टाळणे अतिशय योग्य होणार आहे.कला नाट्यक्षेत्र या व्यक्तींना नवीन संधी मिळणार आहे.
तुळ - आपण आत महत्वाची कामे आणि प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहात. त्यातून भरघोस फायदा मिळणार आहे. आपणास घरातून व बाहेरून चांगला सहयोग मिळणार आहे.
वृश्चिक - महत्त्वाची कामे आज पूर्ण करून घ्या. वास्तववादी विचाराने फायदे होणार आहेत. जुने विचार संकल्पना प्रगतीला मारक ठरण्याची शक्यता आहे. सरकारी कामांमध्ये मदत मिळेल.
धनु - आर्थिक समस्या दूर होणार आहेत. खाजगी आयुष्य बरोबर कोणत्या तरी सामाजिक धर्मदायी काम या उपक्रमात स्वताला गुंतून घेतल्यास आपल्याला आनंद मिळणार आहे.
मकर - स्वतःच्या प्रकृतीची स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे तुमच्याविषयी वाईट विचार करणारी व्यक्ती कटू संबंध संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रतिसाद चांगला द्या.
कुंभ - व्यापार व्यवसायात वाढ होणार आहे. त्यामुळे धनलाभ चांगल्या प्रकारे होणार आहे. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळणार आहे. नियोजनपूर्वक काम केल्याने वेळेत होणार आहे.
मीन - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यात आपली प्रकृती स्वास्थ्य चांगले ठेवणे आवश्यक आहे. अति कामाने थकल्यासारखे होण्याची शक्यता आहे.