आजचे राशिभविष्य, १० जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 10, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष : आपल्या मनातील उदासीनता दूर होणार आहे आपला गुण म्हणजे सातत्याने काम करणे आणि धैर्य असणे या गुणांचा आपणाला आठ चांगलाच फायदा होणार आहे.

वृषभ: गुंतवणुकीच्या दृष्टीने कठीण असा निर्णय पुढे ढकलला. अचानक बदललेल्या एखादा प्रश्नामुळे,किंवा अडचणीमुळे कौटुंबिक शांततेला धक्का लागू शकतो.

मिथुन : पनीय माहिती कोणाला उघड करू नका. तुम्हाला तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करणार नाही ,असे आपणाला वाटू शकते, पण संयम ठेवा धीर घालवू नका अनावश्यक खर्च टाळणे बरे.

कर्क : आज आपण झटपट कामाला लागणार आहात. स्वतःच्या मनाप्रमाणे कामाची आखणी करा. आवश्यक ठिकाणी अनेकांची मदत मिळणार आहे.

सिंह : घरात तुमच्या आवडीचे पदार्थ तयार होतील. महत्त्वाची बातमी समजू शकते. व्यवसायात विक्री चांगली होईल. जोडीदारा बरोबर चांगले संबंध राहतील. घरातील सदस्यांचे विचारपूस करा.

कन्या : मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्या. तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज चीज होणार आहे. तुम्हाला मिळालेल्या यशाची चव चाखून पाहाच. तुम्ही लोकप्रिय व्यक्तींच्या संपर्कात येणार आहात.

तुळ : तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांकडून शिकण्यासाठी हा अनुकूल कालावधी आहे. मित्र व ओळखलीच्या व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लाभकारक ठरतील.

वृश्चिक : तुम्ही चांगल्या कार्यासाठी दानधर्म कराल. तुमच्या मुलांना यश मिळेल. आणि तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होणार आहे. आजचा दिवस सुखासीनतेचा जाणार आहे. अनपेक्षित लाभ होतील.

धनु : नोकरीच्या ठिकाणी आपली जबाबदारी वाढणार आहे. आरोग्यासाठी हा थोडा वाईट कालावधी आहे. तुमची मन शांती चांगली ठेवणे आवश्यक आहे.

मकर : व्यापार व्यावसायिक पातळीवर केलेली भागीदारी तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुम्ही ज्या बदलाची वाट पाहत होतात तो बदल आज घडून येणार आहे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडल.

कुंभ : आपले एकूणच वागणे साधारण साधारण असणार आहे. तुम्ही कामातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या. काही समस्या आणि काही आरोग्य हे मुद्दे उपस्थित राहतील.

मीन : अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. कामे पूर्ण होतील. मुलांना अपेक्षित यश मिळणार आहे. नोकरीत आपले मत विचारात घेतले जाईल. वरिष्ठ आणि सहकारी तुम्हाला समजून घेतील.

logo
marathi.freepressjournal.in