आजचे राशिभविष्य, १० जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 10, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - आपल्या कला अथवा छंदासाठी वेळ द्याल एखादी चांगली कलाकृती आपल्या हातून घडू शकते मात्र भागीदारीच्या व्यवसायात नुकसानीची शक्यता, सावध राहणे गरजेचे.

वृषभ - मानसिक प्रसन्नता लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा मध्ये वाढ होईल. नवीन कामे मिळतील जिद्द व चिकाटी वाढून आपली कामे आपण पूर्ण कराल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मिथुन - निरनिराळ्या ठिकाणांहून आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. घरामध्ये एखादे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होईल आप्तेष्ट नातेवाईक भेटतील खर्चामध्ये वाढ होईल.

कर्क - सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. धार्मिक कार्य करण्यासाठी रुची निर्माण होईल. सामाजिक प्रतिष्ठा लावेल शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करू शकाल.

सिंह - सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. आपल्या कामाची दखल घेतली जाऊन लोक संग्रहात वृद्धी होईल. विरोधकांवर मात करू शकाल.

कन्या - जमिनीची तसेच स्थावर मालमत्तेची कामे गतिमान होऊन मार्गी लागतील आर्थिक फायदा होईल. ओळखी मध्यस्ती सफल होतील तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळातून सहाय्य मिळेल.

तुळ - सरकारी तसेच शासकीय कामे जी दीर्घकालीन रखडलेली होती अशा स्वरूपाची कामे मार्गी लागतील. सहाय्य मिळेल. मात्र त्यासाठी धावपळ करावी लागेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

वृश्चिक - नोकरीमध्ये वरिष्ठांचे तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत राहील. शुभवार्ता समजतील. एखादी नवी जबाबदारी स्वीकारावी लागेल.

धनु - व्यवसाय धंद्यात तसेच नोकरी मध्ये नवीन नवीन संधी मिळतील आपल्या हातातील संधीचे सोने करणे आपल्याच हाती आहे हे लक्षात ठेवावे. वाहने चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे.

मकर - व्यापार-व्यवसायात प्रगती कारक परिस्थिती निर्माण होईल नवीन करार होऊ शकतात तसेच व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील . सरकारी नियमांचे पालन आवश्यक.

कुंभ - नोकरीमध्ये पदोन्नती वेतन वृद्धि होऊ शकते. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. मित्रमंडळी भेटतील. नवीन उपक्रम ठरवू शकाल. व्यवसाय धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील.

मीन - कुटुंबात अथवा आपल्या कार्यस्थळी वाद-विवाद घडण्याची शक्यता आहे त्यामुळे वाद-विवाद टाळलेले हिताचे ठरेल व्यवसाय-धंद्यात उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल.

logo
marathi.freepressjournal.in