आजचे राशिभविष्य, १० मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 10, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष -आपल्या मनातील उदासीनता दूर होणार आहे आपला गुण म्हणजे सातत्याने काम करणे आणि धैर्य असणे या गुणांचा आपणाला आठ चांगलाच फायदा होणार आहे.

वृषभ - गुंतवणुकीच्या दृष्टीने कठीण असा निर्णय पुढे ढकलला. अचानक बदललेल्या एखादा प्रश्नामुळे,किंवा अडचणीमुळे कौटुंबिक शांततेला धक्का लागू शकतो.

मिथुन -आपली गोपनीय माहिती कोणाला उघड करू नका. तुम्हाला तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करणार नाही ,असे आपणाला वाटू शकते, पण संयम ठेवा धीर घालवू नका.

कर्क - आज आपण झटपट कामाला लागणार आहात. स्वतःच्या मनाप्रमाणे कामाची आखणी करा. आवश्यक ठिकाणी अनेकांची मदत मिळणार आहे.

सिंह - घरात तुमच्या आवडीचे पदार्थ तयार होतील. महत्त्वाची बातमी समजू शकते. व्यवसायात विक्री चांगली होईल. जोडीदारा बरोबर चांगले संबंध राहतील. घरातील सदस्यांचे विचारपूस करा.

कन्या - मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्या. तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज चीज होणार आहे. तुम्हाला मिळालेल्या यशाची चव चाखून पाहाच. तुम्ही लोकप्रिय व्यक्तींच्या संपर्कात येणार आहात.

तुळ - कुटुंबामध्ये एकोपा आणि समजूतदारपणा वाढणार आहे. तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांकडून शिकण्यासाठी हा अनुकूल कालावधी आहे.

वृश्चिक - तुम्ही चांगल्या कार्यासाठी दानधर्म कराल. तुमच्या मुलांना यश मिळेल. आणि तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होणार आहे. आजचा दिवस सुखासीनतेचा जाणार आहे.

धनु - नोकरीच्या ठिकाणी आपली जबाबदारी वाढणार आहे. आरोग्यासाठी हा थोडा वाईट कालावधी आहे. तुमची मन शांती चांगली ठेवणे आवश्यक आहे.

मकर - व्यापार व्यावसायिक पातळीवर केलेली भागीदारी तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुम्ही ज्या बदलाची वाट पाहत होतात तो बदल आज घडून येणार आहे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडल.

कुंभ -आपले एकूणच वागणे साधारण साधारण असणार आहे. तुम्ही कामातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या. काही समस्या आणि काही आरोग्य हे मुद्दे उपस्थित राहतील.

मीन -अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. कामे पूर्ण होतील. मुलांना अपेक्षित यश मिळणार आहे. नोकरीत आपले मत विचारात घेतले जाईल.

logo
marathi.freepressjournal.in