मेष : विशिष्ट महत्त्वाची कामे पूर्ण होतील अश्वासक परिस्थिती राहील. धनलाभ याची शक्यता नोकरी मधील बदल अनुकूल ठरतील मात्र वाद-विवाद टाळणे हिताचे ठरेल प्रवासात सतर्क राहा.
वृषभ : वैवाहिक जीवनातील समज-गैरसमज टाळून वाद-विवाद अलिप्त रहा. व्यवसाया मध्ये वातावरण चांगले राहील जुनी येणी वसूल होतील प्रवाही आणि वेगवान घटना घडतील. कौतुक होईल.
मिथुन : मित्रमंडळींच्या वर्तुळात तसेच कुटुंबांमध्ये वादविवाद टाळा कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. महत्त्वाच्या कामांमध्ये मान्यवरांची मदत मिळेल.
कर्क : अनुकूल घटना घडल्यामुळे आपल्या उत्साहात आणि आनंदात वाढ होईल कौटुंबिक सुख मिळेल. भाग्योदय कारक घटना घडल्यामुळे कुटुंबातील वातावरण चांगले राहील.
सिंह : व्यवसाय धंद्यात सरकारी नियम तसेच कायदे पाळा एखाद्या सरकारी प्रकरणातून त्रास होऊ शकतो. मानसिक संतुलन ठेवा. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्यावे.
कन्या : कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वादविवादा पासून अलिप्त राहणे हितकारक ठरेल. व्यवसाय-धंद्यात उलाढाल वाढून नवीन करारमदार होण्याची शक्यता.
तुळ : शुभ ग्रहांचा वरचष्मा राहील. नोकरीत व्यवसायात आपल्या मताला मान मिळेल कुटुंबात सुवार्ता मिळतील. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. कुसंगती टाळणे हितकारक ठरेल.
वृश्चिक : अचानक महत्त्वाच्या कामात आलेल्या अडचणी अस्वस्थ करतील वैवाहिक जीवनात वाद विवाद नको. व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहील.
धनु : एकूण दिवस चांगला जाईल. समाजातील मान्यवर तसेच थोरामोठ्यांचे आशीर्वाद लागतील गुरुजनांच्या मार्गदर्शनाबरोबरच त्यांची मदतही मिळू शकते. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.
मकर : व्यवसाय धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील व्यवसायात काही नवीन बदल केलेले सफल होतील. भागीदारीच्या व्यवसायात भागीदार आपल्या मतास प्राधान्य देईल.
कुंभ : महत्त्वाची कामे करण्यासाठी अनुकूल दिवस. व्यवसाय धंद्यात तसेच नोकरीमध्ये इतरांशी वादविवाद करू नका. वरिष्ठांशी पटवून घेण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता लागेल.
मीन : काहींना परदेशगमनाचे योग आहेत कुटुंबातील विवाह योग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. मानपानाच्या प्रसंगावरून रंगाचा बेरंग होऊ शकतो.