आजचे राशिभविष्य, १० नोव्हेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 10, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - प्रकृतीची अपेक्षित साथ मिळेल. आज दिवस आनंदात घालवावा आवडत्या मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. मित्र-मैत्रिणींबरोबर मनोरंजनासाठी खर्च करावा लागेल.

वृषभ - आर्थिक नियोजनाचे फायदे होतील. खर्च वाढणार आहे. मनासारखी खरेदी पण कराल आर्थिक प्राप्ति पण त्याच प्रमाणात राहील. तर ती नंतर करा, कामामध्ये काही अडचणी येऊ शकतात.

मिथुन - आज आपण आनंदी व उत्साही रहा ल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वतः लक्ष देऊन काम करा निश्चित पूर्ण होतील. तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जाणवेल.

कर्क - नोकरी-व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहणार आहे. नवीन संधी येतील कोणत्या विचारपूर्वक स्वीकारा यामधील करार नीट आहेत की नाही ते तपासून पाहावे लागणार आहे.

सिंह - आर्थिक धोरण नीट अवलंबा. खर्चाचे प्रमाण वाढले तरी आवकही वाढेल. कामकाजामध्ये महत्त्वाचे बदल होऊ शकतात. त्याप्रमाणे व्यवसायाचे नियोजन करा त्याचप्रमाणे बदलही होतील.

कन्या - महत्त्वाच्या प्रॉपर्टीचा कामांमध्ये लक्ष द्या प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे आज मागे लावू शकाल अत्यंत समाधान कारक दिवस आहे. प्रॉपर्टीच्या व्यवहारात मनासारखा फायदा मिळेल.

तुळ - विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे शिक्षणात प्रगती होईल.आत्मविश्‍वास व मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील. सहजतेने विजय मिळेल.

वृश्चिक - प्रकृतीस्वास्थ्य कडे लक्ष देणे आवश्यक आहे. जास्त काम असेल तर सांभाळूनच करा, सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे.

धनु - अडचणींवर चांगल्याप्रकारे मात कराल. आत्मविश्‍वासपूर्वक काम कराल. व्यवसाय मध्ये नियोजन चांगले असल्यामुळे व्यवसायात फायदे होतील. जोडीदाराचा सल्ला घेऊ शकता.

मकर - आत्मविश्‍वासपूर्वक काम करणे जरुरी आहे. प्रकृतीच्या छोट्यामोठ्या तक्रारी जाणवतील ,कामाचा ताण असल्यामुळे शरीर थकल्यासारखे वाटणारच. कामे पूर्ण करण्यास मदत होईल.

कुंभ - मनाची मरगळ दूर करून कामाला लागाल, चांगल्या संधी समोर दिसतील. संधीचे सोने करणे तुमच्या हातातच आहे. सामाजिक व प्रतिष्ठित कामे आपणाला मिळतील.

मीन - कौटुंबिक जीवनात छोट्या-मोठ्या तक्रारी असतील, त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे जाऊन त्या मोठ्या होतील मग सोडवणे कठीण जाईल.

logo
marathi.freepressjournal.in