मेष रास - महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यामुळे ानसिक प्रसन्नता लाभेल आत्मविश्वास वाढेल मनोबल उत्तम राहील स्वतःच्या कर्तुत्वाला संधी मिळाल्यामुळे आनंदी रहाल.
वृषभ रास - हाती घेतलेले काम पूर्ण जिद्दीने कराल भाग्य साथ देईल. इतरांचीही मदत लाभेल. मात्र प्रयत्न कमी पडू देऊ नका. अचानक धनलाभाचे योग.
मिथुन रास - व्यवसायिक, घरगुती स्वरूपाची कामे जी प्रलंबित होती ती पूर्ण होतील मात्र त्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करणे गरजेचे ठरेल. आरोग्य उत्तम राहील.
कर्क रास - समाजातील मान्यवरांच्या ओळखी होऊन अनेकांशी सुसंवाद साधण्याच्या संधी मिळतील आपले निर्णय अचूक ठरल्यामुळे आपल्या शब्दाला मान मिळेल.
सिंह रास - मनोबल उत्तम राहील. प्रेमिकांना यश. दैनंदिन कामात कार्यमग्न राहाल. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नात कमी पडून देऊ नये. वेळेचे नियोजन महत्त्वाचे राहील
कन्या रास - मनोबल कमी राहिल्यामुळे दैनंदिन कामात आत्मविश्वासाची कमी जाणवेल त्यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे शांत राहून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल.
तुळ रास - व्यावसायिक कामासाठी अथवा नोकरीच्या कामासाठी लहान-मोठे प्रवास करावे लागतील. मनोबल उत्तम राहील. अर्थप्राप्ती मनासारखी होईल.
वृश्चिक रास - शक्यतो महत्त्वाची कामे पुढे ढकला वीत तसेच प्रवासही टाळावेत. मन स्थिर राहील. वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.
धनु रास - मनासारख्या घटना घडल्यामुळे व महत्त्वाच्या कामात यश मिळाल्यामुळे मनोबल उत्तम राहील उत्साह उमेद वाढेल मात्र अतिआत्मविश्वास टाळा.
मकर रास - खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे काहीसे त्रस्त असाल परंतु त्याची काळजी करू नका. पैशाची सोय होत जाईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.
कुंभ रास - स्थावर मालमत्ता बाबत ची कामे होतील परंतु त्यात थोडे सबुरीने घ्यावे मध्यस्थी यशस्वी होतील भावंडांच्या गाठीभेटी होतील गृहसौख्य उत्तम राहील.
मीन रास - महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. कुटुंबातील किंवा मित्रमंडळींच्या वर्तुळातील सल्ला उपयोगी पडू शकतो कौटुंबिक सुख लाभेल काहींना विरोधक त्रस्त करू शकतील.