मेष - कामाचा वेग वाढणार नाही. आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवण्याची जरुरी आहे. काम जास्त पडण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव राहणार आहे.
वृषभ - आपल्या हातून चांगली रचनात्मक कामे होणार आहेत. महत्वाच्या कामामध्ये सातत्य राहील. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. कोणत्याही कामात विलंब होत नाही. याकडे लक्ष द्यावे.
मिथुन - आपण आपल्या बुद्धिचातुर्याने आज काम करणार आहात. पण कामामध्ये सतर्क असता. तरीसुद्धा कामात थोडे लक्ष देणे जास्त जरुरीचे आहे.
कर्क - शुभ ग्रहाच्या भ्र्मणामुळे आपली कामे वेगवान होतील. जर आपण कलाक्षेत्र साहित्य क्षेत्रात काम करत असाल तर मनासारख्या घटना घडतील. व्यापार-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.
सिंह - आपल्याला व्यापार व्यवसाय मध्ये यश येणार आहे. मिळकतीचे नवे प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभ होणार आहे. कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे.
कन्या -आपले मनोबल चांगले राहणार आहे. समोर अनेक कामे दिसणार आहेत.एका वेळी एक काम करणे ईस्ट राहणार आहे.कामाच्या अनेक संधी समोर दिसणार आहे.
तुळ - आज विचारपूर्वक कामे करण्याची गरज आहे. कामे पूर्ण करताना अडचणी समोर दिसणार आहे.जुनी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणतीही गुंतवणुक करू नका.
वृश्चिक - योग्य नियोजन आणि योग्य हालचाली यामुळे नवीन आशादायक चित्र समोर येणार आहे. कामाला चांगली गती येणार आहे.
धनु - शुभ ग्रहांची आपल्याला साथ राहणार आहे. नियमित व्यवहार चांगले होणार आहेत. व्यापार व्यवसाय चांगल्या प्रकारे गती घेणार आहे. प्रापंचिक समस्या चांगल्या तऱ्हेने सोडवाल.
मकर - सातत्याने काम केल्यामुळे काम मध्ये भरघोस यश येणार आहे. नियोजित कामे पूर्ण करणारा आहात.प्रवासाची शक्यता आहे. अध्यात्मिक प्रगती होणार आहे.
कुंभ - महत्त्वाचे काम करताना बारकाईने लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. कुठल्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर नीट वाचूनच सह्या करा. फसवणुकीची शक्यता आहे.
मीन -आपल्या विश्वास पात्र व योग्य व्यक्तीचा सल्ल्याचा महत्त्वाच्या कामात उपयोग करून घ्या. वादग्रस्त विषय टाळणे फार महत्त्वाचे आहे.