मेष : घरातले वातावरण सामंजस्य असणार आहे. मुलांबरोबर उत्तम वेळ घालवणार आहात. नोकरी व्यवसायात प्रगती होईल, आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.
वृषभ : हाती घेतलेल्या कामामध्ये यश येणार आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठीने आनंद होईल. प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे.
मिथुन : आर्थिक स्थिती सर्वसामान्य राहील. इतरांना मदत कराल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नोकरीमध्ये जरा ताण वाढण्याची शक्यता आहे.
कर्क: आजचा दिवस स्वतःसाठी व कुटुंबासाठी चांगला असणार आहे. मन आनंदी राहील. खरेदी होईल. मनासारखी खरेदी कराल. जोडीदाराशी चांगले संबंध राहणार आहे.
सिंह : आज स्वतःला वेळ देणार आहात. स्वतःच्या आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवाल. लेखन-वाचन यासाठी वेळ काढणार आहात. नोकरीमध्ये उन्नती होईल नोकरीत कामाचे नियोजन करा.
कन्या : नोकरीमध्ये आपणास फारसा चांगला काळ नाही. मोठे धाडस करण्याचे टाळा. मोठी उलाढाल टाळणेच बरे. आर्थिक गुंतवणूक करू नका नुकसान होण्याची शक्यता आहे.
तुळ : आज आपले कामाचे नियोजन चांगले असल्यामुळे, कामे नीटनेटकी होणार आहेत. आपल्यामध्ये उत्साह भरपूर असणार आहे. वसायातल्या योग्य निर्णयामुळे आर्थिक आवक चांगली राहील.
वृश्चिक : आज आपण आज दिवस चांगला जाणार आहे. नोकरी चांगला काळ आहे. मनासारखे बद्दल होणार आहे. वरिष्ठांच्या मनासारखे काम केल्यामुळे त्यांच्याशी चांगले संबंध राहतील.
धनु : आपल्या नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडणार आहेत. नोकरीसाठी प्रवासाची शक्यता आहे. आपणास भाग्याची साथ मिळणार आहे. धार्मिक क्षेत्रांमध्ये रुची राहणार आहे. दानधर्म होईल.
मकर : उगाचच मानसिक चिंता सतावण्याची शक्यता आहे. मनोबल चांगले ठेवा. नोकरी मधील अडचणी विचारपूर्वक सोडवा. प्रवास शक्यतो टाळा. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
कुंभ : नको असलेली कामे समोर येणार आहेत. तरीही सकारात्मक विचार करून ती पूर्ण करा. आर्थिक आवक सामान्य राहणार आहे. व्यापार व्यवसायामध्ये स्वतः लक्ष घालणे आवश्यक आहे.
मीन : नोकरीच्या नवीन संधी येणार आहेत. घरामध्ये नातेवाईक येण्याची संभावना आहे. नातेवाईकांशी गाठीभेटी मुळे चर्चा होतील, चिंता दूर होणार आहे. काही उपयुक्त माहिती समजणार आहे.