मेष - नोकरी व्यवसाय धंदा यामध्ये उत्तम यश मिळेल नवीन करारमदार होण्याची शक्यता आहे काही फायद्याचे सौदे हाती येतील फाजील आत्मविश्वास टाळा.
वृषभ - कामाच्या ठिकाणी सतर्क राहणे आवश्यक आहे आपली कामे इतरांवर सोपवू नका नुकसानीत राहावे लागेल आजचे काम उद्यावर ढकलू नका.
मिथुन - आजचा दिवस वेगवान घटना घडणार आहे काही घटना तडकाफडकी घडतील त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे आपल्या हातात आहे कौटुंबिक शांतता पाळा.
कर्क - आजूबाजूचे वातावरण बदलल्यामुळे कामामध्ये बदल होऊ शकतो बदलत्या कामांमुळे उत्साह वाढेल आत्मविश्वास वाढून महत्त्वाकांक्षाही वाढतील.
सिंह - कुटुंबातील सदस्यांच्या बहुतेक सर्व मागण्या आपण पूर्ण करू शकाल कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्याचे समाधान मिळेल नशिबाची साथ लाभणार आहे.
कन्या - इतरांच्या बोलण्यामध्ये न येता आपल्या मतांवर ठाम राहा लोकांच्या म्हणण्यानुसार मध्ये बदलू नका. अचानक धनलाभाचे प्रमाण वाढेल.
तुळ - मित्रमंडळींच्या समवेत स्वतःच्या मौजमजेसाठी घरातून बाहेर राहावे परंतु कुटुंबाकडे लक्ष द्यावयाला हवे व्यसन व कुसंगती यापासून दूर राहा.
वृश्चिक - रखडलेली कामे मार्गी लावू शकाल सरकारी कामात यश मिळेल व जीवनात सुसंवाद साधू शकाल. जुने मित्र भेटण्याची शक्यता.
धनु - एका वेळेस अनेक विचार करणे टाळा.त्याचप्रमाणे एका वेळेस एकच काम करा मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने चालवताना शांत रहा.
मकर - विद्यार्थ्यांना अतिशय चांगले यश लाभेल एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आपल्या कामात आहे त्या वेळेस काही बदल करावे लागतील.
कुंभ - मनोबल व आत्मविश्वास वृद्धिंगत करणाऱ्या घटना घडल्यामुळे आपण आनंदित रहाल कौटुंबिक सुख मिळून कुटुंबाला जास्ती वेळ द्याल.
मीन - नोकरी व्यवसाय धंदा यामध्ये पूर्वी केलेले नियोजन यशस्वी होताना दिसेल कामांच्या निमित्त्याने प्रवास करावा लागेल प्रवास सुखकर होतील निर्णय बरोबर ठरतील.