आजचे राशिभविष्य, १४ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 14, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - कुटुंबात व बाहेर आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल अडथळे पार करू शकाल नोकरीत अनुकूल घटना घडतील.

वृषभ - अपेक्षेप्रमाणे घडेल इच्छापूर्तीचा दिवस आहे. नोकरीत नवीन बदल घडतील. मात्र स्वतःच्या क्रोधाला आवर घातला पाहिजे. अडथळ्यांवर विजय मिळवाल.

मिथुन - पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून भरघोस फायदा मिळेल महत्त्वाची कामे पूर्ण होतील कुटुंबातील मुलांच्या यशाच्या वाढता मिळतील निरनिराळ्या प्रकारे आर्थिक लाभ होऊ शकतात.

कर्क - धार्मिक कार्यक्रम अथवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेऊन कामे कराल त्यासाठी वेळ आणि पैसा सुद्धा खर्च करावा नवीन लोकांच्या ओळखी होतील.

सिंह - नोकरीत व्यवसायात चांगली परिस्थिती राहील विविध प्रकारचे फायदे होतील मुलांना अपेक्षित यश मिळेल जोडीदाराची मदत मिळू शकते.

कन्या - आपल्या कामगिरीची दखल घेतली जाईल. क्षेत्रात कार्य करणाऱ्या जातकांसाठी उत्तम दिवस आहे. लोकसंग्रह वाढेल. नवीन जबाबदाऱ्या घ्याल.

तुळ - भागीदारीच्या व्यवसायात भागीदारा बरोबर वाद विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे मनात काळजीचे विचार राहू शकतात पैशांची आवक गरजेपुरती राहील.

वृश्चिक - सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये स्वतःचा राग आवरा नाहीतर रंगाचा बेरंग होऊ शकतो जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल.

धनु - महत्त्वाच्या कामात अचानक अडचणी उद्भवल्या मुळे शांतपणे निर्णय घेणे आवश्यक ठरेल नोकरीमध्ये वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल वाद-विवाद नको.

मकर - आपल्या जीवनसाथीच्या किंवा भागीदाराच्या मताला प्राधान्य द्या. त्यांच्याशी वाद अजिबात घालू नका वाद विकोपाला जाऊ शकतात संयम बाळगणे.

कुंभ - आर्थिक प्राप्ती जरी मनासारखी झाली तरी खर्चाचे प्रमाण वाढल्याने अनावश्यक खर्च टाळावेत एखादी चांगली बातमी कळेल कौटुंबिक वाद विवाद टाळावेत.

मीन - दिवस सर्वसामान्य राहिल नोकरीत एखादा निर्णय तुमच्या हिताचे ठरू शकतो पैशाची आवक मनासारखी राहील आरोग्याची काळजी घ्या मनावर ताबा ठेवा.

logo
marathi.freepressjournal.in