मेष - आपले सर्वांशी चांगले संबंध असणार आहेत. व्यवसायातील वाढीमुळे आपण आनंदित राहणार आहात .आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या सुधारणा होणार आहेत.
वृषभ - नोकरीमध्ये खूप काम असल्यामुळे जास्त धावपळ होण्याची शक्यता आहे .कामाचा ताण जाणवणार आहे .आपणास नोकरीमध्ये सहकार्य कमी मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन - तुमची सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाणार आहे तुम्हाला एखादी आनंदाची बातमी समजू शकते. संततीची प्रगती होणार आहे.
कर्क - तुमच्या वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारणार आहे. घरातील व्यक्तींचे आपल्याला हवी तशी साथ मिळणार आहे. आर्थिक बाबतीत सल्ला घेताना घरातील ज्येष्ठांना प्राधान्य द्यावे .
सिंह - आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे. आपल्या कार्यक्षेत्राच्या बाबतीत योग्य व्यक्तीशी विचारविनिमय होणार आहेत. त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी चांगले प्रयत्न होणार आहेत.
कन्या : आपल्या मनातील नकारात्मक विचार काढून टाका. सकारात्मक विचारांनी आपल्या व्यवसायामध्ये वाढ होऊन आर्थिक फायदे होणार आहेत. निर्णय योग्य ठरणार आहेत.
तुळ - या कार्यक्षेत्रामध्ये आपण उत्साहाने काम करणारा आहात. आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी येण्याची शक्यता आहे. पण काही कारणांनी आपण ती घेणार नाही. अनामिक हुरहुर वाटणार आहे.
वृश्चिक -आज मनावर आपल्या कसला तरी मानसिक ताण असणार आहे .व्यवसायातील घडामोडींचा दूरपर्यंत विचार करून पुढचे निर्णय घ्या .समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका .
धनु - सहज म्हणून मित्रांशी संवाद साधाल. आपल्याला आनंद मिळणारच आहे शिवाय काही नवीन माहिती मिळाल्यामुळे स्वतःची प्रगती होण्याची शक्यता आहे. दिवस आनंदात जाणार आहे.
मकर - मनातील उदासीनता दूर करा. तुमच्या उदासीनतेवर तुम्ही मात करणार आहात. आनंदी राहा कामाला उत्साहाने सुरुवात केल्याने त्याचे चांगले फायदे होणार आहेत.
कुंभ - आपल्या हातून मोठी कामे होणार आहेत.त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे.तसेच आज आपला अध्यात्मतिकडे ओढा असणार आहे. धार्मिक प्रवास होऊ शकतात. दानधर्म होईल.
मीन - मनोबल उत्तम ठेवणे फार आवश्यक आहे. अन्यथा कामांमध्ये चुका होतील. व्यापार व्यवसायात चांगले लक्ष द्या. आर्थिक प्रमाण ठीक-ठाक राहील. जोडीदाराशी विसंवाद संभवतो.