मेष - नोकरी व्यवसायामध्ये वादविवादाची शक्यता निर्माण होणार आहे. आपला हट्ट सोडावा लागणार आहे. जवळचा किंवा लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. खिसा आणि पाकीट सांभाळावे.
वृषभ - महत्वाचे नेमून दिलेले काम करण्याकडे आपण पूर्ण लक्ष देणार आहात. व्यापार व्यवसायात मोठी उलाढाल कराल. आर्थिक फायदा होईल. दिवस चांगला जाणार आहे.
मिथुन - घरातील कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. व्यापार व्यवसायातील उलाढाल जेमतेमच असणार आहे. नोकरीमध्ये वातावर जण चांगले असणार आहे.
कर्क - व्यापार व्यवसायातील अडकलेले पैसे मिळणार आहेत. बचती चा विचार करणे आवश्यक आहे. नोकरीमध्ये काही कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे.
सिंह - अचानक धनलाभ ची शक्यता आहे. उधार उसनवारी वसूल होणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. तुमच्या स्वतःच्या कार्यक्षेत्रात काम चांगले होणार आहे.
कन्या - मनाची हुरहुर कमी होईल. चलबिचल पणा निघून जाणार आहे. आपल्यासमोर अनेक कामे असणार आहेत. तातडीच्या कामाला महत्त्व द्यावे लागणार आहे.
तुळ - कामाची व्यवधाने खूप असणार आहे. काम करताना लक्षपूर्वक केले पाहिजे कामांमध्ये चुका होऊ देऊ नका, तीच तीच कामे परत करावे लागण्याची शक्यता आहे.
वृश्चिक - आपले विचार सकारात्मक असणार आहेत नोकरीमध्ये चांगली परिस्थिती असणार आहे आपणास जेवढे या पैशाची गरज आहे ती पूर्ण होणार आहे प्रकृतीची काळजी घेणे.
धनु - नोकरी मध्ये मनासारखे बदल होणार आहे.नोकरीतील नियोजन व व्यवस्थापन नीट असल्यामुळे कामे सुरळीत होणार आहे. कामे तुमची वेळेत पूर्ण कराल.
मकर - आपण धर्मापेक्षा कर्माला महत्त्व देणाऱ्या व्यक्ती आहात. आपले ठराविक महत्वाची काम पूर्ण झाल्यामुळे धार्मिक कामांमध्ये लक्ष द्याल. दानधर्म करण्याची इच्छा होईल. आनंदाचे प्रवास होतील.
कुंभ - लोकांच्या वादविवादात पडू नका. आपण बरे आणि आपले काम बरे असेच धोरण स्वीकारणे आपणासाठी आज चांगले आहे. प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे.
मीन - व्यापार-व्यवसायात आवक-जावक बऱ्यापैकी असंणार आहे. आर्थिक व्यवहार मनासारखी होतील. अपेक्षित लाभ होणार आहेत. भागी दाराशीच तडजोड करावी लागणार आहे.