मेष - आपल्याला अपेक्षित असलेले नोकरीतील महत्त्वाचे बदल घडू शकतात आर्थिक आवक चांगली राहून नवीन नियोजन करण्याचा विचार कराल.
वृषभ - निर्माण झालेल्या अडचणींवर मात कराल. पैशाची आवक चांगली राहील नोकरीत व्यवसायात अपेक्षित यश मिळेल महत्त्वाची कामे पुढे ढकलू नका.
मिथुन - मनासारखी धनप्राप्ती होऊ शकते जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल नोकरीत अनुकूल घटना घडल्यामुळे आनंदी आणि उत्साही रहा मित्रमंडळींच्या यश साजरे कराल.
कर्क - नोकरी-व्यवसाय किंवा आपल्या कार्यक्षेत्रात इतरांच्या मताला प्राधान्य द्या त्यांचे विचार ऐकून घेऊन स्वतःचे निर्णय घ्या त्यातच आपले हित आहे हे लक्षात ठेवा.
सिंह - आरोग्य चांगले राहील. पूर्वी केलेले नियोजन यशस्वी झाल्यामुळे पुढील नियोजनासाठी उत्साही राहाल अपेक्षित असलेली जुनी येणी वसूल होतील.
कन्या - व्यवसाय-धंदा नोकरीत सहकाऱ्यांवर विशेष अवलंबून राहू नका महत्त्वाचे काम स्वतःचा करा आपले ज्ञान अद्यावत ठेवल्यामुळे फायदा होऊ शकेल.
तुळ - आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील व्यवसाय धंद्यातील उधारी वसूल होतील. नवीन उधारी उसनवारी नको. नवीन हितसंबंध तयार होतील.
वृश्चिक - संमिश्र स्वरुपाचा दिवस आहे. काही वेळेस मनाविरुद्ध परिस्थिती असली तरी ती स्वीकारावी लागते हे लक्षात ठेवा निराश होण्याचे कारण नाही.
धनु - चांगल्या बातम्या कानावर पडतील.आपल्या हातून अगोदर झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आवश्यक ती संधी मिळेल. ती दवडू नका. प्रकृतीकडे लक्ष द्या.
मकर - स्थावर मालमत्ता किंवा जमिनीच्या व्यवहारांबाबत सतर्क रहा. इतरांवर अजिबात अवलंबून न राहता स्वतःचे निर्णय उपयोगी पडतील. आरोग्य सांभाळा.
कुंभ - आनंदी दिवस राहील अनेक कामांमध्ये यश मिळेल अडचणी काही वेळेस येण्याची शक्यता पण त्यावर मात कराल कुटुंबात आनंदी वातावरण राहील
मीन - खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक वादविवाद टाळा महत्त्वाच्या विषयी चर्चेद्वारे समस्या सुटतील कुटुंबातील ज्येष्ठांच्या मदतीचा फायदा होईल.