मेष - आजचे ग्रहमान आपल्याला आनंद मिळवून देणारे आहे. आपल्या नोकरीमध्ये काही अडचणी असतील त्या इतरांच्या सहाय्याने आपण सोडवणार आहात.
वृषभ - अनोळखी व्यक्ती वर जास्त जबाबदाऱ्या सोपवू नका. फसवणूक होण्याची शक्यता आहे. आज महत्त्वाची कामे करू नका. कामा मध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे.
मिथुन - शिक्षण संस्थेची संबंध येण्याची शक्यता आहे. त्यातून काम मिळण्याची शक्यता आहे. नियोजनपूर्वक कामे होणार आहे. कामामध्ये सातत्य राहणार आहे. नातेसंबंध सांभाळले जातील.
कर्क - आपल्या कार्यक्षेत्रात सफलता मिळवण्यासाठी संयम फार आवश्यक आहे. कुटुंबातील वाद विवाद त्वरित मिटवणे आवश्यक आहे. घरातील आजारी व्यक्ती कडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे.
सिंह - नातेवाईकांशी चांगले संबंध राहणार आहेत. नव्या योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. परदेशातून अपेक्षित शुभसंदेश येण्याची शक्यता आहे.
कन्या - आपल्या खाजगी बाबी इतरांशी चर्चा करू नका. घरातील काही प्रसंगात दक्ष राहणे इष्ट आहे. चांगल्या विचारांचा पाठपुरावा कराल. खर्चामध्ये अधिक भर पडणार नाही याची काळजी घ्या.
तुळ - आज नवीन कामाला सुरुवात सुरुवात करू नका. नोकरीमध्ये थोडासा तणाव जाणार आहे. व्यवसायामध्ये चांगले यश मिळणार आहे. भावंडांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता.
वृश्चिक - आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. दगदग होईल अशी कामे करू नका. प्रवास शक्यतो टाळलेलाच चांगला. नोकरीमध्ये चांगली स्थिती राहील. मुलांना यश येणार आहे.
धनु - आपल्या व्यापार-व्यवसायात सकारात्मक बदल करणार आहात. नोकरीमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे, पण आपल्या सहकार्यामुळे काम सहज साध्य होणार आहे.
मकर - हाती घेतलेली कामे पूर्ण करा. आपले कर्तुत्व पुन्हा एकदा दाखवून द्याल. आपल्या कार्यक्षेत्रात वादाचे प्रसंग येऊ शकतात असता. गोड बोलून हाताखालील व्यक्तींकडून काम करून घ्या.
कुंभ - आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. तर त्या दृष्टिकोनातून काळजी घेणे फार आवश्यक आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
मीन - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रयत्नशील रहाणे फार आवश्यक आहे. त्यामुळे यशाचे मार्ग सुलभ होणार आहेत. हाती घेतलेल्या कामांमध्ये सफलता मिळणार आहे.