मेष - काहींना दूरचे तसेच जवळचे प्रवास योग येतील कामानिमित्त प्रवास घडेल प्रवास कार्य सिद्ध राहतील प्रवासात नवीन ओळखी होतील मात्र आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित जागी ठेवा.
वृषभ - आरोग्य चांगले राहून आजूबाजूला अनुकूलता भरलेली अनुभवयास मिळेल. चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहता येईल. कौटुंबिक परिस्थिती समाधान कारक राहील.
मिथुन - व्यवसाय धंदा तसेच नोकरी मध्ये सु संधी निर्माण होतील परंतु त्याचे सोने करणे आपल्याच हाती आहे हे लक्षात ठेवा अपूर्व मनोबला च्या जोरावर कार्यमग्न राहाल. कामात गतिशीलता येईल.
कर्क - एखादी चांगली घटना घडल्यामुळे मानसिक अस्वास्थ्य संपुष्टात येईल उत्साह व आत्मविश्वास आहात वाढ होईल. सकारात्मक विचार राहतील.
सिंह - एखादी भाग्यकारक घटना घडल्यामुळे उत्साही व आनंदी रहाल. अर्थ मान सुधारेल. आपल्याला एक नवी दिशा सापडेल रोजचे जीवनमान बदलू शकते. सकारात्मक विचारात वृद्धी होईल.
कन्या - मनाविरुद्ध काही निर्णय घ्यावे लागल्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल फारसा उत्साह जाणवणार नाही आत्मविश्वास टिकवून ठेवण्याची गरज आहे.
तुळ - आरोग्य उत्तम राहील उत्साह आणि उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील. मात्र अतिउत्साह व अती आत्मविश्वासाच्या भरात चुकीचे पाऊल पडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक - चांगल्या लोकांशी संबंध येतील.आपल्या स्वताला न पटणाऱ्या गोष्टींमध्ये भाग घेऊ नका. व्यवसाय धंद्यात आर्थिक मदतीची गरज लागेल. नातेवाईक आप्तेष्ट यांच्या भेटीगाठी होतील.
धनु - आपल्या वर्तणुकीवर व बोलण्यावर नियंत्रण हवे. आपल्या बोलण्याने अथवा वागण्याने इतरांचा अपमान करू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांची मते पटली नाही तरी प्रतिक्रिया देऊ नका.
मकर - प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. नोकरी व्यवसायात उत्तम स्थिती राहील. परंतु वादविवादाची शक्यता असल्यामुळे वाद-विवाद टाळणे हिताचे ठरेल.
कुंभ - घरातील सदस्यांना समजावून घ्या त्यांची मानसिकता सांभाळा. इतरांच्या कलाने घ्यावे लागेल. विरोध दर्शविण्यासाठी सौम्य कृतीचा उपयोग करा. रागावर नियंत्रण आवश्यक राहील.
मीन - बरेच दिवस आपल्या मनात घर करून राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. वडिलोपार्जित संपत्ती विषयीचे असलेले मतभेद घरातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्तक्षेपामुळे संपुष्टात येतील.