मेष : आपल्याला सकारात्मक विचारांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. आजचा दिवस प्रयत्नांती परमेश्वर आहे. त्यामुळे प्रयत्नांमध्ये - कसूर करू नका. आर्थिक लाभ होतील. सावध राहणे आवश्यक.
वृषभ : आजच्या दिवसात आपल्याला नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरीतील बदल आपल्याला फायद्याचे ठरणार आहेत. मात्र नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार आहे.
मिथुन : स्वतंत्र व्यावसायिकांना आजचा दिवस चांगला राहणार आहे. नोकरीमध्ये चांगला कालावधी असेल. हाताखालील वर्गाचे सहकार्य चांगल्या प्रमाणात मिळणार आहे.
कर्क : आपल्या मन प्रसन्न करणारा दिवस जाणार आहे कार्य क्षेत्रात प्रगती होईल संततीचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत कराल. | त्यांच्या यशाने घरातील वातावरण सुखमय होणार आहे.
सिंह : जमीन जुमला ची कामे मनासारखी होणार आहेत भावंडांच्या गाठी भेटी होऊ शकतात ग्रह ते चांगले मिळणार आहे नोकरीमध्ये प्रगती होणार आहे आवक चांगली असणार आहे दानधर्म कराल.
कन्या : आज आपण कामकाजात मग्न राहणार आहे. बौद्धिक विचाराने आणि सहकार्याने काम करून यश मिळवा. चुकीचे - बोलण्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.
तुळ : कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिलास खरा आनंद उपभोगता येणार आहे. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणतीही समस्या हुशारीने व समजूतदारपणे सोडवा.
वृश्चिक : आपल्यासमोर एका वेळेला अनेक कामे दिसणार आहे. तरीसुद्धा एका वेळेस एकच काम करावे. आपणास व्यापार व्यवसायासाठी अनेक संधी येतील. मनोबल वाढवा.
धनु : मनावर अनामिक दडपण राहणार आहे. काही महत्त्वाची कामे लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे आपल्या मनावर थोडे ओझे वाटणार आहे. नोकरीमध्ये अस्थिरता जाणवणार आहे.
मकर : आजचा दिवस सर्व बाबतीत चांगला आहे. आपणास खरे समाधान मिळणार आहे. नोकरदारांना दिलासा मिळेल. संगणक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम दिवस आहे.
कुंभ : नोकरदारांनी वरिष्ठांचे मिळतेजुळते घ्यावे. कामांचे अर्ज करण्यासाठी हा काळ अतिशय चांगला आहे. कला सजावट सजावटीचे सामान या क्षेत्रातील व्यक्तींना चांगली प्रगती होईल.
मीन : आज आपल्या सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा चांगला दिवस राहणार आहे. लोकांच्या मागे उभे राहून त्यांना मदत कराल. आपली चिडचिड पण कमी होणार आहे.