मेष -आपली बाजू शांतचित्ताने मांडल्याने आपल्याविषयी झालेले गैरसमज दूर करता येतील. आपल्या क्षेत्रामध्ये आपण काढलेले अंदाज आणि ठोकताळे बरोबर येणार आहेत.
वृषभ - आपली आवक आणि खर्च याच्यामध्ये खूप तफावत असणार आहे खर्च करताना जपून करा. प्रभास होण्याची शक्यता आहे आपल्या तब्येतीची काळजी घेणे.
मिथुन - नवीन दिवस नवीन मार्ग याचा चांगला अनुभव आपणास आज येणार आहे. वरिष्ठांशी अपेक्षित साथ मिळणार आहे. कामे सुरळीत पार पडतील. विरोधकांच्या कारवायात वाढ होणार आहे.
कर्क - आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभणार आहे. तुम्ही मनोमन सुखावून जाणार आहात. आर्थिक आवक चांगली असणार आहे. विवाह इच्छुकांचे शुभ कार्य होईल.
सिंह - आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी येणार आहे.याबाबतीत मित्रांशी संवाद साधाल.मित्रांची जरी चर्चा केली तरी स्वतःच्या मनाने कार्य करणार आहात.
कन्या - आवक वाढल्याने खर्चही वाढणार आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठांनी सोपविलेली कामे जबाबदारीने अधिक परिश्रमाने पूर्ण करावी लागतील. वेळ वाया घालू नका.
तुळ - मनातील किल्मिष दूर होणार आहे. कामातील सातत्य व एकाग्रता हेच आपल्या यशाचे गमक ठरणार आहे. तुम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात.
वृश्चिक -आपल्या कामामध्ये आपल्याला अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावताना सहकाऱ्यांचा सल्ला घ्या. जिद्दीने सर्व गोष्टींवर मात करा.
धनु -आजचा दिवस आपल्या प्रगतीचा आहे. कोणाची मतभेद होतील असे वागू नका. कोणाला किती जवळ करायचे व किती लांब ठेवायचे हे स्वतःच्या विचारावर अवलंबून आहे.
मकर -आपल्या कष्टाचे फळ आपणास मिळणार आहे. आर्थिक व्यवहार करताना वरिष्ठांची चर्चा करा. कार्यक्षेत्रातील सहकार्यांना विश्वासात घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्या.
कुंभ -उत्साहवर्धक व आनंददायी असा दिवस आहे आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत मिळतील तुमचे मौजेची इच्छा पूर्ण होईल योग्य संधी आपण तत्परतेने पूर्ण कराल.
मीन - योग्य दिशेने व योग्य मार्गाने वाटचाल करून आपले ध्येय साध्य करावे लागेल. विरोधकांना रोखण्यासाठी नवीन डावपेच आखावे लागतील. आपल्या कामांमध्ये दिरंगाई करू नका .