आजचे राशिभविष्य, १६ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 16, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on: 

मेष - नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडतील विशिष्ट घडामोडी घडून आपल्याला त्याचा फायदा मिळेल विशेष प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील.

वृषभ - नोकरी व्यवसायात काही महत्वाच्या घटना घडतील पण त्या आपल्याला अनुकूल ठरतील दिलासा मिळेल. आलेली संकटे परस्पर जातील वैयक्तिक सुवार्ता मिळतील.

मिथुन - जवळपासचे प्रवास घडतील. नोकरीतील बदल सोयीचे ठरतील आपले वर्चस्व वाढेल आपले महत्त्व इतरांना कळेल गृहसौख्य चांगले राहून कुटुंबात समन्वय राहील.

कर्क - धनलाभ होईल धनलाभाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल दिवस विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल भावंड नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील गृहसौख्य चांगले मिळेल मुलांना यश मिळेल.

सिंह - कामाचा ताण कमी होईल अनेक कामे पूर्ण होतील मन आनंदी राहील मनाला थोडी हूर वाटेल आर्थिक आवक चांगली राहील वारसा हक्काचे पैसे मिळतील जुने येणे वसूल होतील.

कन्या - आर्थिक आवक मनासारखी राहील नोकरी प्रगतीकडे वाटचाल चालू राहील असे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला मिळू शकतात मिळालेल्या पैशाची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

तुळ - ग्रहांची साथ आपल्याला मिळाल्यामुळे दगदग कमी होईल भाग्याची साथ चांगली राहील नोकरीत नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. नोकरीत महत्त्वाचा बदल घडू शकतो.

वृश्चिक - आर्थिक भरभराट होईल विविध मार्गांनी पैशाचा ओघ सुरू राहील नोकरीमध्ये पगार वाढ होईल कामाचे स्वरूप बदलेल त्यात हितशत्रूंच्या पण सामावेश असेल.

धनु - भाग्याची साथ-संगत मिळाल्यामुळे आपल्याला दिलासा मिळेल काहींना दूरचे प्रवास घडून येतील तीर्थयात्रा होतील देवदर्शन पर्यटन करावे. नोकरी मध्ये चांगली स्थिती राहील.

मकर - अडचणी दूर होतील प्रवास लाभदायक ठरतील नोकरीत अनुकूल असे बदल होतील आर्थिक स्थिती चांगली होईल जीवन साथीचे सहकार्य पूर्णपणे मिळेल.

कुंभ - अडचणींची तीव्रता कमी होईल ग्रहांची साथ लाभेल जोडीदाराची उत्तम साथ राहील आरोग्यामध्ये सुधारणा होईल महत्त्वाच्या कामात काही अडचणी येऊ शकतात.

मीन - साधक-बाधक अनुभव आपल्याला येतील आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे जीवनसाथी आपली चांगली काळजी घेईल आपण मात्र जुने वाद उकरून काढू नका.